आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India To Open World Cup Defence Against Pakistan On Feb 15

2015 क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाची पहिली लढत पाकिस्‍तानविरुद्ध!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीसीने 2015 क्रिकेट विश्वचषक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. 14 फेब्रुवारी 2015 पासून सुरू होणा-या या टुर्नामेंटमध्‍ये भारत आणि पाकिस्‍तानला एका गटातच ठेवण्‍यात आले आहे. विशेष म्हणजे टीम इंडिया विरूद्ध पाकिस्तान ही पहिली लढत 15 फेब्रुवारी 2015 रोजी होईल.

2015च्‍या विश्वचषकात एकूण 14 टीम सहभागी होणार असून ही टुर्नामेंट 29 मार्चपर्यंत चालेल.10 कसोटी खेळणा-या देशांशिवाय चार असोसिएट देशही या टुर्नामेंटमध्‍ये भाग घेतील. पहिल्‍या दिवशी 14 फेब्रुवारी 2015ला न्‍यूझीलंड-श्रीलंका आणि इंग्‍लंड-ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यादरम्‍यान सामना खेळवण्‍यात येईल.