आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत दौरा एक चांगला अनुभव- अ‍ॅश्‍ले जाईल्‍स

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- टीम इंडियाकडून एकदिवसीय सामन्‍यात 2-3 ने पराभूत झालेल्‍या इंग्‍लंड संघाचे नवनियुक्‍त प्रशिक्षक अ‍ॅश्‍ले जाईल्‍स यांनी भारत दौरा चांगला ठरल्‍याचे म्‍हटले आहे. भारतात अनेक गोष्‍टी शिकण्‍यास मिळाल्‍या असून, तो एक चांगलाच अनुभव होता असे म्‍हटले.

अँडी फ्लॉवर यांच्‍याकडून नोव्‍हेंबर महिन्‍यात इंग्‍लंड संघाच्‍या एकदिवसीय टीमचे प्रशिक्षक पद सांभाळणारे जाईल्‍स यांचा हा पहिलाच दौरा होता. आम्‍हाला मालिका जिंकण्‍यात जरी अपयश आले असले तरी मला यातून खूप काही शिकता आलेले आहे. जसजशी मालिका पुढे जात राहिली तसे मला जास्‍त समजून घेण्‍याची संधी मिळाली. भारताचा हा दौरा खूपच रोमांचक असा राहिला. यावेळी जाईल्‍स यांनी ज्‍यो रूट आणि जेम्‍स ट्रेडवेलच्‍या कामगिरीचे कौतूक केले.