पूर्ण तयारीनिशी मैदानावर / पूर्ण तयारीनिशी मैदानावर उतरण्यास सज्ज-रोहित शर्मा

वृत्तसंस्था

Jan 02,2012 05:31:44 AM IST

सिडने: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुस-या सामन्यात खेळण्यासाठी मी पूर्णपणे तयार झालो आहे. या तयारीनिशी मैदानावर उतरण्यासाठी मी सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्मा याने दिली. खराब फॉर्मात असलेल्या विराट कोहलीच्या जागी भारतीय संघामध्ये स्थान मिळाल्यास आपण चांगली कामगिरी करून दाखवू, अशी ग्वाही रोहित शर्मा याने दिली.
मंगळवारपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसºया कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीत विराटने निराशाजनक कामगिरीचे प्रदर्शन केले. पहिल्या डावात 11 धावा काढणारा विराट दुसºया डावात भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
‘कांगारूंचे आव्हान परतवून लावण्यासाठी मी सज्ज आहे. कसून केलेल्या सरावामुळे कामगिरीचा दर्जाही उंचावला आहे. त्यामुळे दुस-या कसोटीत भारतीय संघाच्या विजयासाठी योगदान देता येईल,’ असा विश्वास रोहितने व्यक्त केला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मालिकेत दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्नात असल्याचे तो म्हणाला.

X
COMMENT