आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Australia 3th Test Match At Parth Seiner Sports Man Kidnapping

संघाच्या सुमार पराभवामुळे वरिष्ठ खेळाडू संकटात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ/नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाकडून सलग तिस-या कसोटीत पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना संघाबाहेर करण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र, वरिष्ठ खेळाडूंना एकाच वेळी संघाबाहेर केले जाऊ शकत नाही, असे कर्णधार धोनीने स्पष्ट केले आहे.
विदेश दौ-यात टीम इंडियाने सलग सात कसोटी सामने गमावले आहेत. या सामन्यांत राहुल द्रविडशिवाय इतर एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आलेली नाही. द्रविडशिवाय एकाही फलंदाजाला आपल्या कारकिर्दीच्या सरासरीप्रमाणे सुद्धा कामगिरी करता आली नाही. द्रविड (52.41) आणि सचिन तेंडुलकर (37.28) यांच्याशिवाय इतर फलंदाजांची सरासरी तर 30 पेक्षाही कमी आहे.
टार्गेट लक्ष्मण
टीकाकारांचे पहिले लक्ष सध्या व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आहे. त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौ-यात अवघ्या 20.28 च्या सरासरीने केवळ 284 धावा काढल्या. कर्णधार धोनीने या सामन्यांत 26.83 च्या सरासरीने 322 धावा काढल्या. सेहवागने यादरम्यान पाच सामन्यांत 15.90 च्या सरासरीने केवळ 159 धावांचे योगदान दिले.
मोठ्या बदलाची गरज
भारतीय संघात मोठ्या बदलाची गरज असल्याचे मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केली आहे. सिनियर्संना बाहेर करून युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे. सोबत प्रथमश्रेणी क्रिकेटच्या स्वरूपात, कार्यक्रमात आणि खेळपट्ट्यांत बदल, सुधारणा करणे गरजेचे आहे, असेही गावसकर म्हणाले.

‘टीम इंडियाच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. बरेच खेळाडू 38, 39 वर्षांचे झाले आहेत. ते आता पूर्वीप्रमाणे युवा राहिलेले नाहीत. संघाला कडक निर्णय घ्यावे लागतील.’
सौरव गांगुली, माजी कर्णधार.
‘जर धोनीला कसोटी क्रिकेटमध्ये आनंद मिळत नसेल तर त्याला कर्णधारपदावरून दूर केले पाहिजे.’
मदनलाल, माजी क्रिकेटपटू.

‘निवड समितीने अशाच खेळाडूंना संघात निवडावे, ज्यांना खेळपट्टी आणि वातावरणानुसार आपल्या खेळात बदल करता येतो. धोनीची फलंदाजीसुद्धा चिंतेचा विषय आहे. मात्र, कोणताही मोठा निर्णय विचार करूनच घ्यावा.’ संजय मांजरेकर, माजी कसोटीपटू.

इंग्लंड/ऑस्ट्रेलियातील कामगिरी
खेळाडू सामने धावा सरासरी 100/50
द्रविड 07 629 52.41 3/1
सचिन 07 522 37.28 0/4
लक्ष्मण 07 288 20.28 0/3
धोनी 07 322 26.83 0/3
गंभीर 06 246 20.50 0/1
सेहवाग 05 159 15.90 0/1