आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Australia 4 Th Test Match News In Marathi

चौथी कसोटी/2 Day : ऑस्ट्रेलियाचे \"स्मिथ\' हास्य! ऑस्ट्रेलिया ७ बाद ५७२ (डाव घोषित)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - स्टीव्हन स्मिथचे पुन्हा एकदा शतक, ऑस्ट्रेलियाच्या ५०० पेक्षा अधिक धावा आणि भारतापुढे पराभव टाळण्याचे संकट...या मालिकेत हे जणू काही एक समीकरणच बनले आहे. सलग तीन कसोटींत अशीच स्थिती बघायला मिळाली. आता चौथ्या कसोटीतही असेच चित्र आहे. चौथ्या अर्थात सिडनी कसोटीत स्मिथने (११७) बुधवारी शतक ठोकले. यानंतर कांगारूंनी त्यांचा पहिला डाव ७ बाद ५७२ धावांवर घोषित केला. दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत भारताने प्रत्युत्तरात १ बाद ७१ धावा काढल्या होत्या.

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी २ बाद ३४८ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मंगळवारचे नाबाद फलंदाज स्मिथ आणि वॉटसन यांनी बुधवारीसुद्धा जबरदस्त फलंदाजी केली. दोघांनी १९६ धावांची दमदार भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला ४०० धावांच्या पुढे पोहोचवले. यादरम्यान वॉटसनने आपले अर्धशतक आणि स्मिथने शतक पूर्ण केले. स्मिथने सलग चौथे शतक ठोकून आपण कारकीर्दीत सर्वोत्तम फॉर्मात असल्याचे सिद्ध केले. स्मिथने २०८ चेंडूंचा सामना करताना १५ चौकारांच्या साहाय्याने ११७ धावा काढल्या.
यानंतर शॉन मार्श (७३) आणि जो. बर्न्स (५८) यांनी ११४ धावांची शतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. मार्शने ११६ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली, तर बर्न्सने ११४ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावा जोडल्या. अखेरीस रेयान हॅरसिने ९ चेंडूंत ५ चौकारांसह २५ धावा ठोकल्या. हॅरसि बाद होताच स्मिथने डाव घोषित केला.

दोन शतके, चार अर्धशतके : ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात दोन शतके आणि चार अर्धशतके झळकली. त्यांच्या अव्वल सहा फलंदाजांनी ५० पेक्षा अधिकचा स्कोअर केला. ऑस्ट्रेलियाकडून कसोटीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले. कसोटीत असे सहाव्यांदा घडले. कांगारूंकडून वॉर्नर आणि स्मिथ यांनी शतके ठोकली.

मो. शमीच्या ०५ विकेट
एससीजीच्या मैदानावर ५ गडी बाद करण्याचा पराक्रम करणारा शमी एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. यापूर्वी या मैदानावर भारताकडून कपिलदेव, कर्सन घावरी, अनिल कुंबळे आणि शिवलाल यादव यांनी ५ गडी बाद केले होते.
स्टीव्हन स्मिथ (६९८ धावा, १३९.६० सरासरी) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तसिऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी, रिकी पाँटिंगने २००३-०४ मध्ये भारताविरुद्ध १००.८५ च्या सरासरीने ७०६ धावा, तर डग वॉल्टरने १९६८-६९ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध ६९९ धावा काढल्या होत्या.
स्मिथने भारताविरुद्ध सलग चार कसोटींत अ‍ॅडिलेड, ब्रसि्बेन, मेलबर्न आणि सिडने येथे शतके ठोकण्याचा पराक्रम केला.

चार किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेतील सर्व लढतींत शतक ठोकणारा स्मिथ पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, अशी कामगिरी सर डॉन ब्रॅडमन यांनी दोन वेळा, तर नील हार्व, मॅथ्यू हेडन यांनी प्रत्येकी एक वेळा केली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, भारताची कशी राहिली सुरुवात, विजय शून्यावर बाद