शिखर धवन लवकर बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ भारताचा चेतेश्वर पुजाराही बाद झाला . 18 धावांवर खेळत असताना हेजलवूडने त्याला बाद केले. तो बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 2 बाद 100 अशी होती. त्यानंतर मुरली विजय आणि कोहली यांची जोडी जमणार असे वाटत असतानाच कोहलीलाही हेडलवूडने 19 धावांवर बाद केले. मात्र विजयने दुसरी वाजू लावून धरत शतक पूर्ण केले. तो मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच लायनच्या एका चेंडूवर हॅडीनने त्याचा झेल घेतला. त्याचे दीडशतक अवघ्या सहा धावांनी हुकले.
विजयचे शतक
मुरली विजयने चांगली कामगिरी करत शकत पूर्ण केले आहे. अॅडिलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही विजयने दोन्ही डावांत अर्धशतक करत 53 आणि 99 धावांची खेळी केली होती. त्यानंतर कामगिरी उंचावत या सामन्यात त्याने शतक केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शतक ठोकणारा विजय हा 7 वा सलामीवीर आहे. त्याच्याआधी वीरेंद्र सेहवागने ही कामगिरी केली होती.