आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिस्बेन टेस्ट : ऑस्ट्रेलियाचा डाव 505 धावांवर संपला. पहिल्या डावात मिळवली 97 धावांची आघाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतावर 97 धावांची आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाचा डाव 505 धावांवर संपुष्टात आला आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथ याचे शतक आणि अष्टपैलू मिशेल जॉन्सनच्या 86 धावांच्या जोरावर कांगारूंनी 500 चा टप्पा पार केला आहे. तळाच्या स्टार्कनेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे.
दुस-या दिवशी 7 धावांवर नाबाद असलेल्या मिशेल मार्शला तिस-या दिवशी फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला त्याच्या धावसंख्येत मोजून चार धावा जोडता आल्या. इशांत शर्माच्या एका सुंदर चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. त्याने 34 चेंडूत 11 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया या धक्क्यातून सावरण्याआधीच वरूण आरोनने ब्रॅड हेडिनला बाद केले. त्यानंतर मात्र जॉन्सन आणि स्मिथने चांगल्या धावा कुटल्या. स्मिथ 133 धावांवर असताना इशांत शर्माने त्याला बाद केले. तर जॉन्सनलाही त्यानेच बाद केले. लियानचा बळी घेतल आरोनने दुसरा बळी मिळवला. अश्विननेही स्टार्कला बाद करत दुसरा बळी मिळवला आणि कांगारुंचा पहिला डाव गुंडाळला.

असा राहिला दुसरा दिवस
ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणा-या गोलंदाज जोश हेजलवूडने 68 धावांवर पाच गडी बाद करत भारताचा पहिला डाव सामन्याच्या दुस-या दिवशी 408 धावांवर संपवला. प्रत्युत्तरात फलंदाजीला मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताचा वेहवान गोलंदात उमेश यादवने तीन धक्के देत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. सामन्याच्या दुस-या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला चार धक्के देत 221 धावांवर रोखले.

उमेश यादवला तीन बळी
सामन्याच्या दुस-या दिवशी गाबामध्ये वेगवान गोलंदाजांची चलती पाहायला मिळाली. वेगवाग गोलंदाजांसाठी हे पिच चांगले मानले जाते. भारताच्या पहिल्या पारीत जोश हेजलवूडने चांगली कामगिरी करत पाच बळी घेतले. तर भारताच्या उमेश यादवनेही ऑस्ट्रेलियाच्या तिघांना बाद केले.

पुढे पाहा, सामन्याचे काही फोटो...