आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस कमालीचा नाटयमय ठरला. शतकी सलामीनंतरही टीम इंडियाची मधली फळी कोलमडली. स्थिर झाल्यानंतरही फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शेवटच्या सत्रात सचिन तेंडुलकर, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत टीम इंडियाच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्यामुळे एकवेळ टीम इंडिया मोठी धावसंख्या उभा करेल असे वाटत असतानाच कांगारूंनी अचूक टप्प्यावर मारा करीत योग्य वेळी विकेट घेतल्या. अश्विन बाद होताच अपांयरनी दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. अश्विनने 12 धावा केल्या. फिरकीपटू लियोनने त्याला पायचित केले. या विकेटबरोबरच लियोनने डावांत पाच विकेट आपल्या नावे केले.
दिवसअखेर टीम इंडियाने 8 बाद 266 धावा केल्या असून भुवनेश्वर कुमार 10 धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाकडून मुरली विजय 57, चेतेश्वर पुजारा 52, रवींद्र जडेजा 43, सचिन तेंडुलकर 32, कर्णधार धोनी 24 आणि अजिंक्य रहाणे 7 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लियोन 5, सिडल, मॅक्सवेल आणि पॅटिन्सनने 1-1 विकेट घेतल्या. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 4 धावांची आघाडी घेतली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.