आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Australia Hyderabad Dhoni Excellent Playing

धोनीने वाढवला सेहवागचा विश्वास!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गॅरी सोबर्स-रोहन कन्हाई, शेन वॉर्न-अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांचे आपसात कधीच जमले नाही, मात्र मैदानावर ते एकीने राहायचे. याचप्रमाणे डॉन ब्रॅडमन यांचेसुद्धा बहुतेक सहकार्‍यांशी मतभेद असायचे, मात्र तरीही ऑस्ट्रेलियन टीम वर्ल्ड नंबर वन होती.'

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई कसोटीच्या दोन्ही डावांत वीरेंद्र सेहवाग धावा काढू शकला नाही. मात्र, कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्यावर जो विश्वास दाखवला तो स्तुती करण्यासारखा आहे. दोन्ही सलामीवीर सेहवाग आणि मुरली विजय पहिल्या कसोटीत अपयशी ठरले असले, तरीही त्यांना फॉर्मात परतण्यासाठी संधी दिली पाहिजे, असे धोनीने म्हटले होते. तसे बघितले तर पहिल्या कसोटीत सेहवाग दुर्दैवी ठरला. रक्षात्मक पुश केल्यानंतरही चेंडू यष्टीला लागला आणि बेल्स पडल्या. धोनीने ठरवले असते तर सेहवागला संघाबाहेर करण्यासाठी तो निवड समितीवर दबाव निर्माण करू शकला असता. मात्र, त्याने वादविवादाला पूर्णविराम देण्याला महत्त्व दिले.
तसे पाहिले तर क्रिकेटमध्ये विजयी संघात बदल न करण्याची परंपरा राहिली आहे. धोनीने त्याचेच पालन केले. यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे त्याने सेहवागचा बचाव केला. त्याने सेहवागला मॅच विजेता क्रिकेटपटू म्हणताना त्याच्या आक्रमक फटक्यांचीही स्तुती केली. वीरू आपल्याच शैलीत खेळेल. त्याला बदलता येणे शक्य नाही, हे धोनीनेसुद्धा मान्य केले आहे. वीरू एखादा फटका मारतो, त्यावेळी त्यावर खूप स्तुती होती. मात्र, एखाद्या चुकीच्या फटक्यावर तो बाद झाला तर त्याने फटका निवडताना चूक केली, असे वाटत असल्याचेही धोनी म्हणाला. सेहवागबाबत धोनीच्या सहानुभूती शब्दांनी आश्चर्य होणे साहजिक आहे. गेल्या काही दिवसांपासून धोनी आणि सेहवाग यांच्यात मतभेद असल्याची खूप चर्चा रंगत आहे. धोनीने वीरूची पाठराखण करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तसे बघितले तर दोघांत अंतर्गत मतभेद असले तरीही मैदानावर सर्वच जण आपल्या देशासाठी खेळतात आणि चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्न करतात. उदाहरण म्हणून घ्यायचे झाल्यास शेन वॉर्न आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांच्यात कधीच जमले नाही. मात्र, वॉर्नच्या फिरत्या चेंडूवर सर्वाधिक झेल गिलख्रिस्टनेच घेतले. याचप्रमाणे वॉर्न आणि स्टिव वॉ यांच्यातही मतभेद असायचे. मात्र, वॉर्नने बहुतेक वेळा मॅच विजेता कामगिरी स्टिव वॉ कर्णधार असतानाच केली. या तिघांत वाद असतानासुद्धा ऑस्ट्रेलियाची टीम प्रदीर्घ काळ नंबर वन होती. वेस्ट इंडीजचे गॅरी सोबर्स आणि रोहन कन्हाई यांच्यातसुद्धा अखेरपर्यंत मतभेद होते. मात्र, हे दोघेही मॅच विजेता क्रिकेटपटू होते. ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन महान क्रिकेटपटू असले तरीही ते खेळताना त्यांच्या टीमच्या सहकार्‍यांसोबत त्यांचे कधीच जमले नाही. नेहमी वाद व्हायचे. या मतभेदाला 1932-33 च्या बॉडीलाइन सिरीजपासून सुरुवात झाली होती. वादानंतरसुद्धा ब्रॅडमन जोपर्यंत खेळत राहिले तोपर्यंत ऑस्ट्रेलियाची टीम जगभर आघाडीवर होती. वीरूबाबत बोलायचे झाल्यास गेल्या एक दशकात त्यानेही शानदार प्रदर्शन करून भारताला कसोटी क्रमवारीत नंबर वन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वीरू 34 वर्षांचा असला तरीही तो पूर्वीपेक्षा अधिक फिट दिसत आहे. ड्रेसिंग रूममधील वादाचा परिणाम मैदानावरील कामगिरीवर पडता कामा नये, असे मला वाटते. धोनीने जे सकारात्मक पाऊल टाकले आहे त्यामुळे सेहवागचा आत्मविश्वास वाढेल. वीरू पुन्हा बॅटीने धमाल करण्यास सुरुवात करेल, अशी आशा आहे.