आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Australia Hyderabad Test Day 2 Live Score

पुजारा-विजयचे झुंझार शतक, भारताची सामन्‍यावर पकड घट्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरु असलेल्या दुस-या कसोटी सामन्यावर भारताने पकड घट्ट केली आहे. सामन्‍याच्‍या दुसर्‍या दिवशी भारता चेतेश्‍वर पुजारा आणि सलामीवीर मुरली विजयच्‍या नाबाद शतकाने ऑस्‍ट्रेलियाचे डावपेच पूर्णपणे उद्ध्‍वस्‍त केले. दुस-या दिवसाचा खेळ संपला त्‍यावेळी चेतेश्‍वर पुजारा 162 तर मुरली विजय 129 धावांवर नाबाद होते. दोघांनी नाबाद 294 धावांची विक्रमी भागीदारी करुन दुस-या दिवसाच्‍या खेळावर संपूर्ण वर्चस्‍व गाजविले. दुस-या दिवसाचा खेळ संपला त्‍यावेळी भारताची 1 बाद 311 धावा अशी स्थिती होती. भारताने 74 धावांची आघाडी घेतली आहे.

पुजाराचे धडाकेबाज दिडशतक
सर्वप्रथम चेतेश्‍वर पुजाराने शतक पूर्ण केले. सेहवाग लवकर बाद झाला त्‍यावेळी पुजाराने अतिशय सावध खेळ केला. उपहारापर्यंत ऑस्‍ट्रेलियाला यश मिळू दिले नाही. त्‍यानंतर पुजारा आणि विजयने आक्रमक फलंदाजी केली. सर्वप्रथम पुजाराने शतक पूर्ण केले. त्‍यानंतर त्‍याने आणखी फटकेबाजी केली. पीटर सिडलला त्‍याने हुकचा षटकार मारुन दिडशतक पूर्ण केले. पुजाराला धावताना अडचण येत होती. गुडघ्‍याच्‍या शस्‍त्रक्रीयेतून तो नुकताच सावरला आहे. परंतु, वेदना सहन करत त्‍याने झुंझार खेळी केली.

विजयचा शतकी धडाका
पहिल्‍या कसोटीत दोन्‍ही डावात सपशेल अपयशी ठरलेल्‍या विजयने डोहर्तीला पुढे सरसावत चौकार मारुन शतक पूर्ण केले. शतक पूर्ण होताच त्‍याने आक्रमक पावित्रा घेतला. परंतु, पुजाराने फटकेबाजी सुरु केल्‍यानंतर त्‍याने फटकेबाजीला वेसण घातले.

विक्रमी भागीदारी
पुजारा आणि विजयने ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध विक्रमी द्विशतकी भागीदारी केली. दुस-या विकेटसाठी ही ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध भारताची विक्रमी भागीदारी आहे. दोघांनी नाबाद 294 धावा जोडल्‍या. ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध ही चौथी सर्वोच्‍च भागीदारी आहे. या भागीदारीने 2001 मध्‍ये व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मण आणि राहुल द्रविडने कोलकात्‍यात केलेल्‍या 376 धावांच्‍या भागीदारीच्‍या स्‍मृती ताज्‍या केल्‍या.

उपहारानंतर गेम चेंज

उपहाराआधी मुरली आणि पुजारा दोघेही कांगारुंच्या दबावाखाली खेळत असल्याचे चित्र होते. मात्र, उपहारानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेण्यास सुरुवात केली. पहिल्या सत्रात ५० धावांसाठी भारतीय फलंदाजांना २८ षटकांची वाट पाहावी लागली. मात्र, उपहारानंतर मैदानात आलेल्या या जोडीने केवळ एका तासात अर्धशतक पूर्ण केले. त्यासोबतच शतकी भागीदारी केली.

क्लार्कची रणनीती ठरली फ्लॉप
हैदराबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हैदराबादची खेळपट्टी सुरुवातीला दोन दिवस फलंदाजांना मदत करेल आणि नंतर येथे फिरकीपटू दादागिरी करतील, असे बोलले जात होते. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन टीम 9 बाद 237 धावा अशी संकटात सापडली होती. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला पाच षटके शिल्लक असताना क्लार्कने भारताची एखादी विकेट घेण्याच्या इराद्याने आपला डाव घोषित केला. मात्र, क्लार्कची रणनीती पूर्णत: फ्लॉप गेली.

(कोणाच्या नावे आहे सर्वात कमी धावसंख्येवर डाव घोषित करण्याचा जागतिक विक्रम? जाणून घेण्यासाठी फोटोला क्लिक करा.)