आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहालीच्या पीसीए स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या तिस-या कसोटीच्या पाचव्या दिवशी यजमान टीम इंडिया विजयाच्या नजीक पोहोचली आहे. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर धोनी ब्रिगेड नवा इतिहास रचण्याच्या जवळ पोहोचली आहे.
सुरूवातीला सलामीवीर शिखर धवनने विक्रमी पर्दापण करताना विजयाचा पाया रचला. त्यानंतर गोलंदाजांनी पाहुण्या संघाला नाचवले. कर्णधार मायकेल क्लार्क जायबंदी असताना मैदानात उतरला. मात्र, त्याचा हा निर्णय अयोग्य असल्याचे सिद्ध झाले. सामना वाचवण्यासाठी त्याला मैदानात थांबता आले नाही.
रवींद्र जडेजाने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन करताना ऑस्ट्रेलियन कर्णधाराला पाचव्यांदा बाद केले.
पुढच्या स्लाईडला क्लिक करून फोटोंच्या माध्यमातून जाणून घ्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील लढतीची ताजी परिस्थिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.