आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Australia One Day Match News In Marathi

तिरंगी मालिका: यजमान ऑस्ट्रेलियाशी टीम इंडिया आज लढणार, विजय आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - भारतीय संघ सोमवारी तिरंगी मालिकेत अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाशी लढणार आहे. यजमान संघाने आपले सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकून यापूर्वीच फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, भारताचा दोन सामन्यांत पराभव झाला आहे. हा सामनासुद्धा भारताने गमावला तर फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण होईल. अशा स्थितीत भारताला पुढच्या सामन्यात इंग्लंडला बोनस गुणांसह पराभूत करावे लागेल आणि रनरेटही उत्तम ठेवावा लागेल.

भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना "करा किंवा मरा' अशा स्थितीचा असेल. भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजीत अद्याप चांगली कामगिरी केलेली नाही. विराट, धवन, रहाणे आणि रायडू यांना अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात शतक ठोकणारा रोहित जखमी असल्याने संघाबाहेर आहे. अशा स्थितीत उर्वरित फलंदाजांना पूर्ण ताकदीने खेळावे लागेल. गोलंदाजीत धोनीसाठी आशादायक बाब म्हणजे ईशांत आणि जडेजाच्या फिटनेसच्या बाबत पूर्वीपेक्षा तंदुरुस्त दिसत आहेत.

कांगारू पूर्ण फॉर्मात : दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण फॉर्मात आहे. कर्णधार जाॅर्ज बेली एका सामन्याच्या बंदीनंतर संघात पुनरागमन करेल. भारताविरुद्ध सामन्यात संघात बदल करण्यात येतील, असे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी स्पष्ट केले आहे. शॉन मार्शच्या जागी डेव्हिड वॉर्नर खेळेल.

सिडनी भारतासाठी फलदायी नाही : भारताने सिडनीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत १३ सामने खेळताना फक्त एकामध्ये विजय मिळवला आहे. २००८ मध्ये भारताने तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियाला हरवले होते. तशीच कामगिरी करण्यास टीम इंडिया या वेळी आतुर असेल. सोमवारी सिडनीच्या चेंडूला कमी उसळी देणाऱ्या खेळपट्टीवर भारत दोन फिरकीपटूंसह खेळू शकतो. कांगारू झेव्हियर डोहर्तीला खेळवण्याचा विचार करीत आहेत.
* थेट प्रक्षेपण सकाळी ८.५० वाजेपासून स्टार स्‍पोर्ट्स १, ३ वर
* रोहित खेळणार नाही; धवन, बेलीचे होणार पुनरागमन
पुढील स्‍लाइडवर वाचा, भारतीय संघासमोरील अडचणी...