आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत Vs ऑस्ट्रेलिया आज दुसरा सराव सामना; कोहली-वॉटसन समोरासमोर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी दुसरा सराव सामना खेळवला जाईल. यामध्ये जबरदस्त फॉर्मात असलेले विराट कोहली आणि शेन वॉटसन हे फलंदाज समोरासमोर येतील. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूर्वतयारीसाठी सुरू झालेल्या सराव सामन्यात दोन्ही टीमने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. भारताने र्शीलंकेवर मात केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने विंडीजचा पराभव केला. येत्या 6 जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला प्रारंभ होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 फेब्रुवारीला सिडनी येथे शेवटचा सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 87 धावांनी भारतावर मात केली होती. दीर्घ काळानंतर या दोन्ही संघांत सामना रंगणार आहे.

भारताने बर्मिंगहॅममध्ये र्शीलंकेविरुद्ध सराव सामन्यात यशस्वीपणे 334 धावांचे लक्ष्य गाठले. विराट कोहली आणि दिनेश कार्तिकने शानदार शतक ठोकून भारताला विजय मिळवून दिला. मात्र, सामन्यात सलामीवीर व वेगवान गोलंदाजांनी निराशा केली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या वेगवान गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे चिंतेत आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा दर्जा सुधारण्यावर भर देणार असल्याचे त्याने यापूर्वी स्पष्ट केले आहे.

ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यात विंडीजवर 4 विकेटने विजय मिळवला. या सामन्यात वॉटसन मॅच विनर ठरला. त्याने आयपीएलपाठोपाठ सराव सामन्यातही फटकेबाजीची लय कायम ठेवत 98 चेंडूंत 135 धावा काढल्या.

इरफान, ईशांतवर नजर
र्शीलंकेविरुद्ध सराव सामन्यात अपयशी ठरलेल्या इरफान पठाण, भुवनेश्वरकुमार, ईशांत शर्मा आणि विनयकुमार यांच्या कामगिरीकडे सर्वांची नजर असेल. या चौघांनी पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी करून सर्वाधिक धावा दिल्या.