आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Australia Second Test Match Today Hyderabad

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी आजपासून, आर.अश्विनवर असणार खास नजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- भारत व पाहुणा ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्‍या कसोटीला शनिवारपासून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे. या सामन्याच्या दोन दिवसांपासून दोन्ही टीमने कसून सराव केला. या कसोटीत भारतीय संघ विजयी आघाडीच्या घेण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा भर पलटवार करण्यावर असेल.
चेन्नईमध्ये आठ विकेटने विजय मिळवल्यामुळे भारतीय संघ फॉर्मात आहे. टीम इंडियाचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा परत आला आहे. कर्णधार धोनीलादेखील फलंदाजीचा लय गवसली. चेन्नई कसोटीतील धोनीच्या द्विशतकाने कांगारूंना धडकी भरली आहे. धोनीला कमी धावात रोखण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलिया टीम करणार आहे.
भारतीय फिरकीपटूंवर मदार - टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विनने चेन्नई कसोटीत 12 विकेट घेतल्या. हरभजनसिंग व रवींद्र जडेजाला अपेक्षित यश मिळाले नाही. हैदराबाद कसोटीसाठी हरभजनसिंग व प्रग्यान ओझा यांच्यातील एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केली जाऊ शकते.
वेगवान गोलंदाजीत दम नाही - चेन्नई कसोटीत ईशांत शर्मा आणि युवा वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमारने निराशा केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. हैदराबादमध्ये दोन्ही टीमच्या वेगवान गोलंदाजांसमोर चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आहे.
क्लार्कचा यांच्यावर विश्वास- मागील सामन्यात जेस पॅटिंसनने सहा विकेट घेतल्या. तसेच लॉयनने चार बळी मिळवले. मिशेल जॉन्सनला या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केल्या जाऊ शकते. वेगवान गोलंदाजीबरोबरच मायकल क्लार्क, वॉटसन, वॉर्नर, हेनरिक्स, सलामीवीर एड कोवान, लिप ह्यूजच्या रूपात टीमच्या फलंदाजीचा क्रम मजबूत व संतुलित राहणार आहे.

भारताची मजबूत बाजू
1. फलंदाजीत चांगला फॉर्म
चेन्नई कसोटीत महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरने चांगली फलंदाजी केली. हे तिघेही चांगल्या फॉर्मात आहेत.
2. अश्विन छाप पाडू शकतो
पहिल्या कसोटीत अश्विनने 12 बळी घेतले. मागील वर्षी त्याने हैदराबादच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटींत दोन्ही डावांत प्रत्येकी सहा बळी घेतले होते. टीम इंडियाने ही कसोटी डाव व 115 धावांनी जिंकली होती.
3. फिरकीचे जाळे
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आपल्या फिरकीपटूंसमोर फिके पडले. केवळ कर्णधार क्लार्क व हेनरिक्सने चांगली खेळी केली. भारतीय स्पिनर्स अश्विन, जडेजा, हरभजन सिंगने मिळून 20 विकेट घेतल्या. क्लार्क व हेनरिक्स वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजांचा भारताच्या फिरकीपटूंसमोर निभाव लागला नाही.
4. लकी मैदान
भारतीय संघासाठी राजीव गांधी स्टेडियम लकी आहे. या मैदानावर गतवर्षी भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी जिंकली होती.

संभाव्य टीम
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वरकुमार, हरभजनसिंग, प्रग्यान ओझा, ईशांत शर्मा.

ऑस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), शेन वॉटसन, एड कोवान, फिलिप ह्यूज, डेव्हिड वॉर्नर, हेनरिक्स, मॅथ्यू वेड, नॅथन लॉयन, पीटर सिडल, मिशेल स्टार्क, मिशेल जॉन्सन, मॅक्सवेल, जेव्हियर डोहर्ती.

कांगारूंसाठी आव्हान
चेन्नई कसोटीत दोन ओपनरला ( सेहवाग, मुरली विजय) वगळता चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वरकुमारने धावांचा पाऊस पाडला. या सर्व फलंदाजांचे ऑस्ट्रेलिया टीमच्या वेगवान गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल. चेन्नई कसोटीत पाहुण्या टीमला आपले डावपेच यशस्वी करता आले नाहीत. कांगारू टीममध्ये फिरकीपटूंची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याची चर्चा केली जात आहे.


महेंद्रसिंग धोनी सर्वात यशस्वी कर्णधार
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियावरच्या विजयासह महेंद्रसिंग धोनीने कर्णधाराच्या भूमिकेत सर्वाधिक सामने जिंकून देण्याच्या सौरव गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी केली. सर्वात यशस्वी कर्णधार म्हणूनही धोनीने आपला विक्रम केला आहे. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पाच वेळा भारतामध्ये ऑस्ट्रेलिया टीमवर विजय मिळवून दिला आहे. यामध्ये मोहाली (ऑक्टोबर 2008), नागपूर (नोव्हेंबर 2008), मोहाली (ऑक्टोबर 2010), बंगळुरू (2010) व चेन्नई (फेबु्रवारी 2013) यांचा समावेश आहे.

थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स
वेळ : सकाळी 9. 30 वाजेपासून
स्थळ : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल (हैदराबाद)