Home | Sports | From The Field | india-vs-australia-sydney-test-day-2-score-live

सिडनी कसोटी- क्‍लार्क, पॉटिंगने ठोकली शतके

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jan 04, 2012, 08:13 AM IST

ऑस्‍ट्रेलियाने पाहुण्‍या भारतीय संघाचा पहिला डाव 191 धावांवर संपूष्‍टात आणला.

  • india-vs-australia-sydney-test-day-2-score-live

    सिडनी- भारत-ऑस्‍ट्रेलिया सिडनी कसोटीच्‍या दुस-या दिवशी यजमान ऑस्‍ट्रेलियाने तीन गडयांच्‍या बदल्‍यात 258 धावा केल्‍या. रिकी पॉटिंग आणि मायकेल क्‍लार्क खेळत आहेत. क्‍लार्कने आज शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत आपले 18 वे शतक पूर्ण केले. दुस-या बाजूने पॉटिंगनेही आपले 40 वे शतक पूर्ण केले. पॉटिंगने मेलबर्न कसोटीच्‍या दोन्‍ही डावातही अर्धशतक केले होते. दोघांच्‍या शतकी भागीदारीने भारतीय गोलंदाजांच्‍या मर्यादा उघडया पडल्‍या आहेत.
    पहिल्‍या दिवशीचा खेळ
    पहिल्‍या दिवशीचा खेळ संपण्‍यापूर्वी ऑस्‍ट्रेलियाने पहिल्‍या डावात तीन गडी बाद 116 धावा बनवल्‍या होत्‍या. पॉटिंग 44 आणि क्‍लार्क 47 धावांवर खेळत होते. ऑस्‍ट्रेलियाने पाहुण्‍या भारतीय संघाचा पहिला डाव 191 धावांवर संपूष्‍टात आणला.

Trending