Home | Sports | From The Field | india-vs-australia-sydney-test-day-2-score-live

सिडनी कसोटी- टीम इंडियाला ऑस्‍ट्रेलियाने धो-धो धुतले

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jan 04, 2012, 10:05 AM IST

क्‍लार्कने आज शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत आपले 18 वे शतक पूर्ण केले. दुस-या बाजूने पॉटिंगनेही आपले 40 वे शतक पूर्ण केले.

  • india-vs-australia-sydney-test-day-2-score-live

    सिडनी- भारत-ऑस्‍ट्रेलिया सिडनी कसोटीच्‍या दुस-या दिवशी यजमान ऑस्‍ट्रेलियाने चहापानापर्यंत चार गडयांच्‍या बदल्‍यात 349 धावा केल्‍या. माईक हसी आणि मायकेल क्‍लार्क खेळत आहेत.
    क्‍लार्कने आज शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत आपले 18 वे शतक पूर्ण केले. दुस-या बाजूने पॉटिंगनेही आपले 40 वे शतक पूर्ण केले. या जोडीने 288 धावांची भागीदारी केली. धोनीने नवा चेंडू घेतल्‍यानंतर इशांत शर्माने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. स्थिरावलेल्‍या पॉटिंगला इशांतने तेंडुलकरच्‍या हाती झेल देण्‍यास भाग पाडले. पॉटिंग 134 धावांवर बाद झाला. चहापानापर्यंत ऑस्‍ट्रेलियाने 349 धावा केल्‍या आहेत. मायकेल क्‍लार्क 170 धावांवर तर माईक हसी आठ धावांवर खेळत आहेत. ऑस्‍ट्रेलियाने 158 धावांची आघाडी घेतली आहे.
    तत्‍पूर्वी, ऑस्‍ट्रेलियन फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाजी पूर्णपणे निष्‍प्रभ ठरली. रिकी पॉटिंग आणि मायकेल क्‍लार्कने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

    पहिल्‍या दिवशीचा खेळ
    पहिल्‍या दिवशीचा खेळ संपण्‍यापूर्वी ऑस्‍ट्रेलियाने पहिल्‍या डावात तीन गडी बाद 116 धावा बनवल्‍या होत्‍या. पॉटिंग 44 आणि क्‍लार्क 47 धावांवर खेळत होते. ऑस्‍ट्रेलियाने पाहुण्‍या भारतीय संघाचा पहिला डाव 191 धावांवर संपूष्‍टात आणला.

Trending