Home | Sports | From The Field | india-vs-australia-sydney-test-day-2-score-live

सिडनी कसोटी- ऑस्‍ट्रेलियाकडून टीम इंडियाची जमके धुलाई

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jan 04, 2012, 12:53 PM IST

ऑस्‍ट्रेलियाने पाहुण्‍या भारतीय संघाचा पहिला डाव 191 धावांवर संपूष्‍टात आणला.

 • india-vs-australia-sydney-test-day-2-score-live

  सिडनी- भारत-ऑस्‍ट्रेलिया सिडनी कसोटीच्‍या दुस-या दिवशी यजमान ऑस्‍ट्रेलियाने चार गडयांच्‍या बदल्‍यात 406 धावा केल्‍या. कर्णधार मायकल क्‍लार्कने शानदार द्विशतक झळकावले. माईक हसी आणि मायकल क्‍लार्क खेळत आहेत. आतापर्यंत हसी-क्‍लार्क जोडीने 82 धावांची भागीदारी केली आहे.
  क्‍लार्कने आज धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. तो 209 धावांवर नाबाद आहे. ऑस्‍ट्रेलियाच्‍या फलंदाजांकडून करण्‍यात आलेले हे 34 वे द्विशतक ठरले. दुस-या बाजूने पॉटिंगनेही आपले 40 वे शतक पूर्ण केले. या जोडीने 288 धावांची भागीदारी केली. धोनीने नवा चेंडू घेतल्‍यानंतर इशांत शर्माने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. स्थिरावलेल्‍या पॉटिंगला इशांतने तेंडुलकरच्‍या हाती झेल देण्‍यास भाग पाडले. पॉटिंग 134 धावांवर बाद झाला. चहापानापर्यंत ऑस्‍ट्रेलियाने 349 धावा केल्‍या. मायकल क्‍लार्क 209 धावांवर तर माईक हसी 26 धावांवर खेळत आहेत. ऑस्‍ट्रेलियाने 215 धावांची आघाडी घेतली आहे.
  तत्‍पूर्वी, ऑस्‍ट्रेलियन फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाजी पूर्णपणे निष्‍प्रभ ठरली. रिकी पॉटिंग आणि मायकेल क्‍लार्कने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
  पहिल्‍या दिवशीचा खेळ

  पहिल्‍या दिवशीचा खेळ संपण्‍यापूर्वी ऑस्‍ट्रेलियाने पहिल्‍या डावात तीन गडी बाद 116 धावा बनवल्‍या होत्‍या. पॉटिंग 44 आणि क्‍लार्क 47 धावांवर खेळत होते. ऑस्‍ट्रेलियाने पाहुण्‍या भारतीय संघाचा पहिला डाव 191 धावांवर संपूष्‍टात आणला.

Trending