Home | Sports | From The Field | india-vs-australia-sydney-test-day-2-score-live

सिडनी कसोटीवर ऑस्‍ट्रेलियाचे वर्चस्‍व, कर्णधार क्‍लार्कचे तडाखेबाज द्विशतक

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jan 04, 2012, 12:55 PM IST

क्‍लार्कने शानदार खेळीचे प्रदर्शन करताना कारकीर्दीतील 18 वे शतक लगावले. क्‍लार्कने शतकावरच समाधान न मानता दमदार द्विशतकही ठोकले.

 • india-vs-australia-sydney-test-day-2-score-live

  सिडनी- भारत-ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यातील सिडनी कसोटीच्‍या दुस-या दिवशीचा खेळ संपेपर्यंत यजमान ऑस्‍ट्रेलियाने चार गडी गमावून 482 धावा केल्‍या. कर्णधार मायकल क्‍लार्क 251 तर माईक हसी 55 धावांवर नाबाद आहेत. ऑस्‍ट्रेलियाने पहिल्‍या डावात 291 धावांची आघाडी घेतली आहे.
  दिवसभरात भारताकडून इशांत शर्मालाच एक गडी टिपता आला. इशांतने शतकवीर रिकी पॉटिंगला सचिन तेंडुलकरच्‍या हाती झेल देण्‍यास भाग पाडले. पॉटिंग बाद होण्‍यापूर्वी त्‍याच्‍यात आणि हसीमध्‍ये चौथ्‍या गडयासाठी 288 धावांची भागीदारी झाली.
  क्‍लार्कने शानदार खेळीचे प्रदर्शन करताना कारकीर्दीतील 18 वे शतक लगावले. क्‍लार्कने शतकावरच समाधान न मानता दमदार द्विशतकही ठोकले. कर्णधार झाल्‍यापासूनचे त्‍याचे हे पहिलेच द्विशतक ठरले.
  दिवसभराच्‍या खेळात भारतीय गोलंदाजी पूर्णपणे निष्‍प्रभ ठरली. भारतीय गोलंदाजीचा वेगवान मारा पॉटिंग आणि क्‍लार्क जोडगळीने आरामात खेळून काढला. नियमित गोलंदाजांकडून यश मिळत नसल्‍याचे पाहून धोनीने काहीवेळ सेहवागकडे गोलंदाजीची धुरा सोपवली.
  दुस-या बाजूला पॉटिंगने कारकीर्दीतील 40 वे शतक लगावले. यापूर्वी पॉटिंगने मेलबर्न कसोटीतील दोन्‍ही डावात अर्धशतके केली होती. दोघांच्‍या शतकी भागीदारीने भारतीय गोलंदाजांच्‍या मर्यादा उघडया पडल्‍या.
  पहिल्‍या दिवशीचा खेळ
  पहिल्‍या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ऑस्‍ट्रेलियाने पहिल्‍या डावात तीन गडयांच्‍या बदल्‍यात 116 बनवल्‍या होत्‍या . पॉटिंग 44 आणि क्‍लार्क 47 धावांवर नाबाद होते. ऑस्‍ट्रेलिया संघ्‍ा 75 धावांनी पिछाडीवर होता.
  आपले मत
  इंग्‍लड दौ-याप्रमाणेच टीम इंडियाची अवस्‍था ऑस्‍ट्रेलिया दौ-यात होईल का? अजूनही तुम्‍हाला टीम इंडियाच्‍या फलंदाजांकडून अपेक्षा आहेत काय ? यावर आपणही आपले मत खालील कॉमेंट बॉक्‍समध्‍ये नोंदवू शकता. आक्षेपार्ह मतास वाचक स्‍वत: जबाबदार असतील.

Trending