सिडनी कसोटी लाईव्‍ह- / सिडनी कसोटी लाईव्‍ह- भारताताला चौथा धक्‍का, लक्ष्‍मण बाद

दिव्‍यमराठी वेब टीम

Jan 03,2012 07:20:32 AM IST

सिडनी- भारत-ऑस्‍ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामन्‍यात टीम इंडियाने चार गडयांच्‍या बदल्‍यात 72 धावा केल्‍या. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर खेळत आहेत.
जेम्‍स पॅटिन्‍सनने घातक गोलंदाजी करताना सलामीवीर वीरेंद्र सेहवागला बाद केले. हिल्‍फेनहासच्‍या गोलंदाजीवर मिळालेल्‍या जीवदानाचा फायदा ही सेहवागला उचलता आला नाही. रिकी पॉंटिंगने दुस-या स्‍लीपमध्‍ये त्‍याचा झेल सोडला होता. त्‍यानंतर 30 धावांवर तो बाद झाला. सेहवाग पाठोपाठ व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणही झटपट बाद झाला.
टीम इंडियाला गौतम गंभीरच्‍या रूपात पहिला धक्‍का बसला. पहिल्‍याच षटकाच्‍या तिस-या चेंडूवर गंभीर शून्‍य धावेवर तंबूत परतला. मेलबर्न कसोटीत हिरो ठरलेल्‍या जेम्‍स पॅटिन्‍सनने गंभीरला बाद केले. त्‍यानंतर भरवश्‍याचा फलंदाज राहुल द्रविडलाही काही खास करता आले नाही. पीटर सीडलने त्‍याला पाच धावांवर बाद केले.
यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून पहिल्‍यांदा फलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या कसोटीत अपयशी ठरलेल्‍या विराट कोहलीला दुस-या कसोटीतही संधी देण्‍यात आली आहे. मालिकेत ऑस्‍ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर आहे.

X
COMMENT