आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Australia Test Match At Parth Warner Is The Best

वॉर्नर = सचिन + द्रविड + लक्ष्मण + सेहवाग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ: सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांचा जगातील अशा दिग्गज फलंदाजांच्या यादीत समावेश होतो; मात्र सध्या खेळाडू सुमार फॉर्मशी संघर्ष करीत आहेत.
एखाद्या माणसाचा वाईट काळ येतो, त्या वेळी उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो, असे म्हटल्या जाते. ही म्हण भारताच्या या चार दिग्गज फलंदाजांना लागू पडत आहे. यामुळे या चार दिग्गज फलंदाजांवर एकटा कांगारूं वरचढ ठरला.
पर्थ कसोटीत वॉर्नरने 180 धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत वॉर्नरने 20 चौकार आणि 5 षटकार ठोकले. ज्या खेळपट्टीवर वॉर्नरने 180 धावा ठोकल्या, त्याच खेळपट्टीवर भारताच्या 11 फलंदाजांना मिळून सुद्धा त्याच्या इतक्या धावा काढता आल्या नाहीत. पहिल्या डावात भारताचा 161 धावांत खुर्दा झाला. दुसर्‍या डावात भारताने 171 धावांवर लोटांगण घातले.
भारतीय संघाच्या दिग्गजांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, दोन्ही डावातील त्यांचा स्कोअर गचाळ राहिला. सचिन तेंडुलकर (15, 8), राहुल द्रविड (9, 47), लक्ष्मण (31, 0) आणि वीरेंद्र सेहवाग (0, 10) यांनी अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही.
भारताच्या या चार दिग्गजांनी दोन्ही डावांत मिळून अवघ्या 120 धावा केल्या आणि एकट्या वॉर्नरने 180 धावा काढल्या.