आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओल्ड ट्रॅफर्डवर विजयाचे कठीण आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारत-इंग्लंडदरम्यान इन्वेस्टेक कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवारपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर होत आहे. या मैदानावर 24 वर्षांनंतर दोन्ही संघ समोरासमोर असतील. या मैदानावर भारताला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. येथे दोन्ही संघांत आतापर्यंत 8 कसोटी सामने झाले, यात 3 इंग्लंडने जिंकले. उर्वरित सामने ड्रॉ झाले.

येथे 52 धावांचा नीचांक भारताच्या नावे आहे. भारताने ही गचाळ कामगिरी 1952 मध्ये केली होती. येथे इंग्लिश संघाचा एका डावातील सर्वांत कमी स्कोअर 294 धावा आहे. यजमान संघाने येथे 8 कसोटीत सात वेळा आपला डाव घोषित केला. या मैदानावर भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर माजी कर्णधार मो. अझरुद्दीनच्या नावे आहे. त्याने या मैदानावर 1990 मध्ये 179 धावांची खेळी केली होती. या बळावर भारताने 432 धावा काढल्या होत्या.

मँचेस्टर मैदानावरील शतकवीर भारतीय
भारत : विजय र्मचंट (114: 1936), सय्यद मुश्ताक अली (112: 1936), अब्बास अली बेग (112: 1936), पॉल उमरीगर (118 : 1959), सुनील गावसकर (101 : 1974), संदीप पाटील (129 : 1982), मो. अझरुद्दीन (179 : 1990), सचिन तेंडुलकर (119 : 1990). इंग्लंड : लेट हटन (104 : 1952), ज्योफ पुलर (131 : 1959), माइक स्मिथ (100 : 1959), रे इंलिगवर्थ (107 : 1971), ल्युकहस्र्ट (101 : 1971), किथ फ्लेचर (117 : 1974), जॉन एडरिच (100 : 1974), इयान बॉथम (128 : 1982), ग्रॅहम गुच (116 : 1990), माइक ऑथरटन (131 : 1990), रॉबिन स्मिथ (121 : 1990), अँलन लँब (109 : 1990).

टॉसचा बॉस
येथे भारत-इंग्लंड यांच्यात 8 सामने झाले. यात 2 वेळा भारताने तर 6 वेळा इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला.

17 व्या वर्षी सचिनचे शतक
भारतीय संघ 24 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मँचेस्टरवर सामना खेळणार आहे. मागच्या वेळी येथे भारताकडून सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी 119 धावांची सामना वाचवणारी खेळी केली होती.