आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'विराट\' खेळीच्‍या पायावर घरच्‍या मैदानावर धोनीने चढविला विजयाचा कळस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- कर्णधार महेंद्र सिंग धोनीने घरच्‍या मैदानावर कडक चौकार मारुन भारताच्‍या विजयावर शिक्‍कमोर्तब केले आणि रांचीच्‍या नव्‍या मैदानात एकच जल्‍लोष झाला. इंग्‍लंडसंघाकडून मिळालेले 156 धावांचे माफक आव्‍हान भारताने 3 फलंदाजांच्‍या मोबदल्‍यात पूर्ण केले. विराट कोहलीने फॉर्ममध्‍ये परतत तडाखेबाज 77 धावांची नाबाद खेळी केली. तर युवराज सिंगनेही काही अप्रतिम फटके मारून लयीत असल्‍याचे संकेत दिले. परंतु, ट्रेडवेलच्‍या एका चेडुवर चुकला आणि त्रिफळाचीत झाला. मात्र, त्‍यापूर्वी त्‍याने कोहलीसह तडाखेबाज अर्धशतकी भागीदार करुन भारताचा विजय निश्चित केला होता.

विराटने 59 चेंडुंमध्‍ये अर्धशतक ठोकले. त्‍याने 77 धावांच्‍या खेळीत 2 षटकार आणि 9 चौकार ठोकले. तर याच खेळीमध्‍ये त्‍याने वन डे क्रिकेटमध्‍ये 4 हजार धावा पूर्ण केल्‍या. विव्‍ह रिचर्ड्सनंतर सर्वात वेगवान 4 हजार धावा पूर्ण करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्‍याने 96 व्‍या सामन्‍यात हा टप्‍पा गाठला. त्‍याने गौतम गंभीरसोबत अर्धशतकी भागीदारी केली. गंभीर बाद झाल्‍यानंतर युवराज आणि कोहलीले 48 चेंडुंमध्‍ये 66 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाला पहिला धक्‍का अजिंक्‍य रहाणेच्‍या रूपात बसला. रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. स्‍टीवन फीनने टाकलेल्‍या अप्रतिम अशा गुड लेंग्‍थ चेंडूवर त्‍याचा त्रिफळा उडाला. त्‍यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरने अर्धशतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. दोघेही भरात फलंदाजी करीत असतानाच गंभीरचा एक फटका बसला. जेड ट्रेडवेलच्‍या गोलंदाजीवर मिडऑनवर तो झेलबाद झाला. त्‍याने 53 चेंडुंमध्‍ये 33 धावा काढल्‍या.