आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इंग्लंड सामना ‘पाण्यात’, बुधवारी हाेणाऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्टल- भारत अाणि इंग्लंड मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मुसळधार पावसामुळे ‘पाण्यात’ गेला. साेमवारी पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द झाला. पाऊस इतका जोरदार होता की या सामन्याची नाणेफेकही करता अाली नाही. वरुणराजाच्या वक्रदृष्टीमुळे पाच सामन्यांच्या मालिकेतील राेमांचक लढतीचा अानंद लुटण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल झालेल्या चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. अाता मालिकेतील दुसरा वनडे सामना बुधवारी कार्डिफमध्ये हाेणार अाहे. मात्र, या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याची शक्यता वर्तवली जात अाहे.

नुकत्याच झालेल्या कसाेटी मािलकेत पराभवातून सावरलेल्या भारतीय संघाला वनडे मालिकेत दमदार पुनरागमन अाणि धडाकेबाज विजयासह चांगली सुरुवात करण्याची अाशा हाेती. मात्र, टीम इंडियाच्या या अाशेवर पाणी फेरले गेले. कार्डिफच्या मैदानावर दाेन्ही संघ समाेरासमाेर येणार अाहेत.