आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Vs England ODI Series Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-इंग्लंड पाचवा वनडे : क्लीन स्वीपचे प्रयत्न !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लीड्स - भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा वनडे शुक्रवारी लीड्सच्या मैदानावर खेळवला जाईल. भारताने मालिकेत ३-० ने विजयीआघाडी घेतली आहे. आता अखेरचा सामना जिंकूनक्लीन स्वीपच्या इराद्याने टीम इंडिया खेळेल.

काही दिवसांपूर्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. आता तीन वनडे जिंकल्यानंतर त्याला चॅम्पियन म्हटल्या जात आहे. आयसीसी जागतिक वनडे क्रमवारीत टीम इंडिया पुन्हा नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे. आता मालिकेतील ही विजयीआघाडी कायम ठेवण्यासाठीच लीड्सवर टीम इंडिया खेळेल. आपल्या नेतृत्वाखाली विदेशी भूमीवर १०२ पैकी ५५ वनडेमध्ये विजय मिळवणारा धोनी मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
युवा खेळाडूंना संधी
भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील तीन लढती जिंकून मालिका आधीच आपल्या िखशात घातली आहे. अखेरचा सामना म्हणजे फक्त औपचारिकता शिल्लक आहे. या सामन्यात टीम इंडिया आपल्या राखीव फळीतील खेळाडूंना संधी देऊ शकते. या लढतीत वेगवान गोलंदाज उमेश यादव, संजू सॅमसन, कर्ण शर्मा यांना संधी मिळू शकते. या खेळाडूंच्या जागी जडेजा, धवल कुलकर्णी, रैना यांना विश्रांती दिली जाऊ शकते.
दोन्ही संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंगधोनी (कर्णधार), शिखर धवन, अिजंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, धवल कुलकर्णी, उमेश यादव, मोहित शर्मा.
इंग्लंड : अॅलेस्टरकुक (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, गॅरी बॅलेंस, जो. रुट, इयान माेर्गन, जोस बटलर, मोईन अली, अॅडम वोक्स, बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, ट्रेडवेल, स्टिवन फिन, हॅरी गुर्नी, क्रिस जॉर्डन.
भारताची मजबूत बाजू
- सलामीवीर अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि अंबाती रायडू चांगल्या फॉर्मात आहेत.
- शिखर धवनही लयीत परतला आहे. मागच्या सामन्यात त्याने नाबाद ९७ धावा काढल्या होत्या. विराट कोहलीच्या फॉर्मातही सुधारणा होत आहे.
- भारतीय वेगवान गोलंदाजीची जोडी भुवनेश्वर कुमार आणि मोहंमद शमी चांगल्या लयीत आहेत.
- फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा मॅच विजेता कामगिरी करण्यात सक्षम आहेत.
इंग्लंडसमोरील अडचणी
- कसोटी मालिकेत हुकमी एक्का ठरलेला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसला तीन वनडे सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. अचानक त्याचा फॉर्म हरवला आहे.
- मोईन अली शिवाय इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करता आलेला नाही.
- गोलंदाजीत गुर्नी, स्टिवन फिन, क्रिस वोक्स आणि मोईन अली यांना भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात अपयश.
- कसोटीत ज्या जोशाने इंग्लंडच्या फलंदाजांनी खेळ केला, तो जोश, ती इच्छाशक्ती वनडेत िदसली नाही.

भारतच वर्ल्डकपचा दावेदार : सचिन
मुंबई - आपल्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू असल्याने २०१५ मध्ये ऑस्टेलिया न्यूझीलंड येथे होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच प्रबळ दावेदार अाहे, असे भारतरत्न सचिन तेंडुलकरने म्हटले. भारतीय संघ संतुलित असून, भारताला पराभूत करणे अवघड आहे. भारताच्या वनडे संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. फलंदाजी मजबूत आणि गोलंदाजीत विविधता आणि क्षेत्ररक्षणदेखील उत्कृष्ट आहे, असे सचिनने मुंबईत आयोिजत एका कार्यक्रमात म्हटले.
डंकन फ्लेचर धोनी