बर्मिंगहॅम- मालिकेतील चौथ्या वनडेत यजमान इंग्लंडला गड्यांनी पराभूत करीत भारताने मालिका विजय निश्चित केला. यासह भारताने मालिकेत ३-० ने आघाडी घेतली. इंग्लंडमध्ये भारताने 24 वर्षांनी मालिका विजय मिळवला. यापूर्वी 1990 मध्ये अझहरच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली होती.
यापूर्वी कसोटीमध्ये भारताची कामगिरी अत्यंत लाजीरवाणी राहिली होती. त्याचा वचपा काढत भारताने एकदिवसीय मालिका जिंकली. भारतीय गोलंदाजांना आणि फलंदाजांना चांगलाच सुर गवसला. कार्डिफमध्ये सुरेश रैनाने शानदार शतक लगावले होते तर बर्मिघममध्ये सलामीवीर अजिंक्य रहाणे (106), शिखर धवनच्या (नाबाद 97) फलंदाजीमुळे भारताचा 30.3 षटकांतच विजय मिळविला.
गोलंदाज ठरले हीरो
इंग्लेडविरुध्दच्या विजयामध्ये भारताकडून गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. भुवनेश्वरकुमारने सुरेख गोलंदाजी करत केवळ 15 धावसंख्येवर इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजाना तंबून पाठविले.
इंग्डंलडचा डाव कोसळवण्यासाठी भुवीने पाया घातला आणि भारतीय फिरकीपटूंनी त्यावर कळस चढविला. अन् भारताला मोठा विजय मिळवून दिला.
मोहम्मद शमीची अतुलनीय कामगिरी
शमीने 28 धावा देत 3 विकेट मिळविल्या. एजबेस्टन मैदानावर भारतीय गोलंदाजांनी केलेले हे आतापर्यंतचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन राहिले आहे.
शमी केवळ एका धावेने गांगुलीचा किर्तीमान विक्रम मोडू शकला नाही. गांगुलीने 27 धावांवर 3 फलंदाजांना बाद केले होते.
बर्मिघम येथे भारतीय गोलंदाजांचे उत्कृष्ट प्रदर्शन
सौरव गांगुली - 3/27 - 29 मे1999
मोहम्मद शमी - 3/28 - 2 सप्टेंबर 2014
इरफान पठान - 3/34 - 19 सप्टेंबर 2004
रुद्रप्रताप सिंह - 3/55 - 27 ऑगस्ट 2007
भुवनेश्वर कुमार - 2/14 - 2 सप्टेंबर 2014
पुढील स्लाइडवर वाचा, विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावणा-या खेळाडूविषयी