आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs England One Day Cricket Match, Kardif, Sports

आज रंगणार भारतविरुद्ध इंग्लंड सामना; टीम इंडिया नव्या उत्साहासह खेळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्डिफ- इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ३-१ ने सपाटून मार खाल्ल्यानंतर आता दोन्ही संघ वनडे मालिकेत समोरासमोर असतील. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे होऊ शकला नाही. आता बुधवारी कार्डिफ येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाईल.

दुसऱ्या वनडेत दोन्ही संघ नवा उत्साह आणि नव्या उमेदीसह मैदानावर उतरण्यास सज्ज झाले आहेत. या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. वरुणराजाची वक्रदृष्टी या लढतीवर पडली नाही तर टीम इंडियाची कामगिरी कशी होते, हे बघावे लागेल.

धोनी ब्रिगेडचे शक्तिस्थान
भारतीय वनडे संघात सात खेळाडूंना सामील करण्यात आले आहे. हे सातही जण कसोटी संघात सामील नव्हते. या खेळाडूंत सुरेश रैना, अंबाती रायडू, संजू सॅमसन, कर्ण शर्मा, धवल कुलकर्णी, उमेश यादव आणि मोहित शर्मा यांचा समावेश आहे. हे खेळाडू टीम इंडियाची ताकद वाढवतील, अशी आशा केली जात आहे.

विराटच्या फॉर्मकडे लक्ष
कसोटी मालिकेत विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला होता. मात्र, सराव सामन्यात कोहलीने ७१ धावा ठोकून फॉर्मात येण्याचे संकेत दिले.विराट फॉर्मात आला तर भारताची मधली फळी मजबूत होईल. असे झाले तर टीम इंडिया वनडे मालिका जिंकू शकेल. भारताने २०१३ला इंग्लंडमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. येथील खेळपट्ट्यांची भारतीय खेळाडूंना अडचण येणार नाही, असे मानले जात आहे. तसेसुद्धा भारतीय खेळाडू वनडे स्पेशािलस्ट मानले जातात.

रोहित, धवनवर असेल दबाव
कसोटी मालिकेत भारताची सलामीची जोडी पूर्णपणे अपयशी ठरली होती. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर सलामीला धावा जोडण्याचा दबाव असेल. धवन कसोटी मािलकेत अपयशी ठरला होता. यामुळे तीन कसोटीनंतर त्याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर करण्यात आले होते. रोहितसुद्धा कसोटीत बाहेर बसला होता. यामुळे दोन्ही खेळाडूंवर स्वत:ला सिद्ध करण्याची जबाबदारी असेल.

बिन्नी खेळणार ? : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्टुअर्ट बिन्नीला संधी मिळेल की नाही, हे सांगणे कठीण आहे. बिन्नीचा भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याची गोलंदाजी हवी तशी सशक्त नाही. यामुळे त्याची निवड कठीण वाटते. त्याच्या जागी कर्ण शर्मा किंवा उमेश यादवला संधी मिळू शकते.

मोर्गन संघात
इंग्लंड संघात अॅलेक्स हेल्स आणि स्टिवन फिनचे पुनरागमन झाले आहे. यजमानांच्या टीममध्ये इयान मोर्गनचाही समावेश करण्यात आला आहे. तो वनडे स्पेशालिस्ट फलंदाज आहे. वनडे गोलंदाजीत जेम्स ट्रेडवेलचा उपयोग होऊ शकतो. ट्रेडवेल हा फिरकीपटू आहे.

यॉर्कर सुधारण्यात अक्रमची मदत
वसीम अक्रमने मला अचूक यॉर्कर टाकण्यासाठी मदत केली आहे, असे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत-अ संघाकडून शानदार गोलंदाजी करणाऱ्या उमेश यादवने म्हटले आहे. इंग्लंडविरुद्ध मी यॉर्करचा शस्त्र म्हणून उपयोग करणार आहे. यॉर्करसाठी मला मदतीची गरज होती. कारण, माझा चेंडू पायाजवळ थांबत होता. मला वसीमभाई यांनी मदत केली. यॉर्कर टाकताना पूर्ण फोकस तेथे कर, जेथे चेंडू टाकायचा आहे. चेंडू साइडला पडेल की कुठे जाईल, याचा विचार करू नकोस, असे त्यांनी मला सांगितले. याचा फायदा झाला, असे यादव म्हणाला.

दोन्ही देशांचे संघ असे
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा,विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कर्ण शर्मा, मोहित शर्मा, उमेश यादव, मो. शमी, धवल कुलकर्णी.

इंग्लंड : अॅलेस्टर कुक (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, गॅरी बॅलेन्स, इयान बेल, जो. रुट, इयान मोर्गन, जोस बटलर, मोईन अली, िक्रस वोक्स, बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, ट्रेडवेल, िफन, हॅरी गुर्न, िक्रस जॉर्डन.