बर्मिंगहॅम - कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वनडे मालिकेपाठोपाठ आता एकमेव टी-२० सामन्यातही यजमान इंग्लंडला धूळ चारण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० सामना रंगणार आहे. नुकत्याच झालेल्या वनडेत भारताने यजमान इंग्लंडला ३-१ ने धूळ चारून मालिका
आपल्या नावे केली.
अाता इंग्लंडविरुद्ध टी-२० सामन्यातही विजयी लय कायम ठेवण्याचा टीम इंिडयाचा प्रयत्न असेल. यासाठी युवा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन अाणि लेगस्पिनर कर्ण शर्माला संधी मिळवण्याची शक्यता अाहे. वेगवान गाेलंदाज उमेश यादव अाणि धवल कुलकर्णी या दाेघांनाही मालिकेत प्रत्येकी एका वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली हाेती.
भारताचा इंग्लंड दाैरा हा अाता शेवटच्या टप्प्यात येऊन धडकला अाहे. त्यामुळे अाता दाैऱ्याचा शेवटही गाेड करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. त्यामुळे अाता इंग्लंडविरुद्ध टी-२० सामन्यात बाजी मारण्यासाठी
टीम इंडिया शनिवारी प्रयत्नशील असेल. वनडे मालिकेतील विजयाचा सिलसिला या सामन्यातही कायम ठेवण्यावर या संघाचा अधिक भर असेल.
दाेन्ही संघांमध्ये २००७ पासून आतापर्यंत टी-२० चे एकूण सात सामने झाले अाहेत. यातील तीन सामन्यांत भारताने विजय संपादन केला. तसेच चार सामने इंग्लंडने जिंकले. या दाेन्ही संघांतील शेवटचा टी-२० सामना मुंबईत डिसेंबर २०१२ मध्ये झाला हाेता. या सामन्यात इंग्लंडने सहा गड्यांनी विजय मिळवला होता.
त्यामुळे गत सामन्यातील या पराभवाचा वचपा काढण्यासाठी धाेनी िब्रगेड कशा प्रकारे कसरत करते याकडे सर्वांची नजर असेल.
विराटला शेवटची संधी?
इंग्लंड दौऱ्यात सपशेल अपयशी ठरलेल्या
विराट कोहलीसाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळे त्याला या सामन्यात मोठी खेळी करून स्वत:ला सिद्ध करावे लागेल. तसेच वनडे मालिकेत चांगली खेळी करणाऱ्या सलामीवीर शिखर धवनने दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.