आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs England Third One Day Cricket Match Today

बाप्पाला विजयाचे साकडे, टीम इंडिया समोर आज तिसरा वनडे जिंकण्याचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉटिंगहॅम- लाडक्या गणरायाच्या आगमनाने देशभरातील चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हाच उत्साह कायम ठेवण्यासाठी सर्व विघ्न पार करत भारतीय संघ शनिवारी इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. गत सामन्यात इंग्लंडचा १३३ धावांनी दणदणीत पराभव करणाऱ्या टीम इंडियाचे दुसरा विजय मिळवण्याचे मिशन असेल. कसोटीत सपाटून मार खाल्ल्याने टीकेचा भडिमार सहन केलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत आपले वर्चस्व परत मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावा लागणार आहे. नॉटिंगहॅमच्या मैदानावर दुपारी ३ वाजता इंग्लंड आणि भारत यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाईल. सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कर्णधार धोनीने या सामन्यात विजय म‍िळवून २-० ची आघाडी मिळवण्याचा निर्धार बोलवून दाखवला. सुरेश रैना, अजिंक्य रहाणे आणि स्वत:च्या प्रदर्शनावर समाधान व्यक्त करत धोनीने शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या खेळावर चिंता व्यक्त केली आहे. दुसऱ्या सामन्यात धवन ११ तर कोहली शून्यावर बाद झाला होता.

प्रभावी गोलंदाजी
गोलंदाजीच्या बाबतीत भुवनेश्वर कुमार आणि मोहंमद शमी या वेगवान जोडीसोबतच आर.अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची फिरकी जोडी संतुलित आहे. बिन्नी, उमेश यादव किंवा धवल कुलकर्णीपैकी एकाला पाचव्या गोलंदाजाच्या रूपात संधी द्यायला हवी. गत सामन्यात रवींद्र जडेजाने ७ षटकांत २८ धावा देत चार विकेट मिळवल्या.

विराट कोहलीला वारंवार संधी का ?
मागच्या ११ डावांमध्ये (१० कसोटी डाव, १ वनडे)विराट कोहली सपशेल अपयशी ठरला आहे. तरीसुद्धा त्याच्याऐवजी अन्य युवा खेळाडूला संधी का दिली जात नाही, असा प्रश्न क्रिकेटतज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. विराटच्या जागी अंबाती रायडू किंवा संजू सॅमसनला संधी द्यायला हवी. शिवाय धवनऐवजी रहाणेला सलामीत खेळायला उतरवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

जखमी रोहीत शर्मा इंग्लंडविरुद्ध मालिकेतून बाहेर
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यांच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारतीय संघाचा रोहित शर्मा बोटाला झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध मालिकेतून बाहेर झाला आहे. या गंभीर दुखापतीमुळे तो आता आगामी तीन वनडेला मुकणार आहे. त्याच्या जागी भारतीय संघात मुरली विजयला संधी देण्यात आली आहे. भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या वनडेत भारताने यजमान संघाचा पराभव केला. तसेच सलामीचा वनडे पावसामुळे रद्द झाला होता. आता मालिकेतील तिसरा सामना शनिवारी होणार आहे.

‘रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी निवड समितीने मुरली विजयला इंग्लंडविरुद्ध आगामी सामन्यात खेळण्याची संधी दिली,’ अशी मािहती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली.