आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Vs Leicestershire Practice Match Latest Score In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्‍लडमध्‍ये पहिल्‍याच सराव सामन्‍यामध्‍ये धवन जायबंदी, कोहली फेल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिसेस्टर- इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाने जोरदार खेळी केली. लिसेस्टरशायर विरोधात झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शिखर धवन, गौतम गंभीर आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतक लगावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीयांनी 4 विकेट गमावून 333 धावा केल्या. अजिंक्य रहाणे 47 तर रोहीत शर्मा 43 धावांवर नाबाद राहिले.
जखमी होऊन परतला धवन
भारतीय संघाचा ओपनर विराट कोहली काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने 49 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने एकुण 29 धावा केल्या. कोहलीला शिव ठाकूरने क्लीन बोल्ड केले.
पुजारा आणि गंभीरने दाखवला दम
तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी गौतम गंभीरने 54 धावांचा खेळ केला. त्याने आपल्या अर्धशतकाच्यावेळी 101 चेंडूंचा सामना करत 7 चौकार लगावले. तो रिटायर्ड आऊट झाला.
भारतीय संघाचा पुढचा राहूल द्रविड होण्याचा दावा करणारा चेतेश्वर पुजारानेदेखील चांगला खेळ केला. 98 चेंडूंचा सामना करत त्याने 57 धावा केल्या त्‍यामध्‍ये 8 चौकार समावेश आहे.
पुढच्या स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचे फोटोज्..