आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज (रविवार) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार असून या हाय होल्टेज सामन्याकडे तमाम चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दुपारी 1.30 वाजता सुरू होणारा हा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, मीरपूर येथे होईल.
ही लढत दोन्ही संघांचे भवितव्य ठरवणारी असेल. दोन्ही संघाना हा सामना 'करा किंवा मरा!' ठरणार आहे. कारण ही लढत जो संघ जिंकेल त्याला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळू , तर दुसरीकडे जो संघ ही लढत गमावेल त्याचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येऊ शकते.
भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची लढत जिंकली असली तरी त्यांना श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता, तर दुसरीकडे पाकिस्तानला पहिल्या सामन्यात श्रीलंकेने पराभूत केले होते आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे जो संघ ही लढत जिंकेल, त्या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची नामी संधी असेल.
उमर अकमल
भारतासाठी उमर अकमला हा पाकिस्तानी विकेटकीपर डोकेदुखी ठरु शकतो. श्रीलंकेविरोधात अकमलने 74 धावा तर अफगाणिस्तानविरोधात 102 धावा काढल्या आहेत. तसे पाहता आतापर्यंत अकमलचे भारताविरुध्द प्रदर्शन पाहिजे तेवढे चांगले राहिले नाही. त्याने भारताविरुध्द 5 सामन्यात 20.60 च्या सरासरीने 103 धावा बनविल्या आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि वाचा, कोणते पाकिस्तानी खेळाडू भारतासाठी ठरु शकतात डोकेदुखी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.