आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Vs Pakistan Asian Emerging Trophy Final Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज भारत-पाक फायनल रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर- भारत व कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात रविवारी 23 वर्षांखालील एसीसी इमिर्जिंग ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची फायनल होणार आहे. सूर्यकांत यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शुक्रवारी अंतिम फेरी गाठली. या संघाने उपांत्य लढतीत संयुक्त अरब आमिरातवर विजय मिळवला होता. दुसरीकडे पाकने सेमीफायनलमध्ये श्रीलंकेचा फडशा पाडला. या विजयासह पाकने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

भारताकडून सूर्यकांत यादव, बाबा अपराजित, अंकित बावणे व उन्मुक्त चंद जबरदस्त फॉर्मात आहेत. तसेच कर्नाटकचा लोकेश राहुल व गुजरातच्या मनप्रीत जुनेजामुळे फलंदाजीत भारतीय संघाचे पारडे जड आहे. स्पर्धेत औरंगाबादचा अंकित बावणेने अष्टपैलू कामगिरी करून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.