आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Pakistan Football Match News In Marathi

चोख बंदोबस्‍तान रंगणार भारत विरुध्‍द पाकिस्‍तान फुटबॉल सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - भारत-पाक फुटबॉल संघाचे कर्णधार)
बंगळुर - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडा संबंध सुरळीत होण्‍यासाठी रविवारी उभय देशांत मित्रत्वाचा पहिला फुटबॉल सामना होणार आहे. उभय संघात दोन सामने खेळविले जाणार आहेत.
2005 साली भारतीय फुटबॉल संघाने पाकचा दौरा केला होता. तेव्‍हापासून या दोन्‍ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. तब्बल 9 वर्षांनी उभय देशातील फुटबॉल संबंध पुन्हा प्रस्थापित होत आहेत. रविवारी बंगळुर येथे होणा-या पहिल्या सामन्यात दोन्ही देशांच्या 23 वर्षाखालील फुटबॉल संघ भाग घेतील. यानंतर दुसरा सामना 20 ऑगस्टला होणार आहे.
भारतीय फुटबॉल संघाने यावर्षीच्या प्रारंभी बांगलादेश विरूध्दची फुटबॉल मालिका बरोबरीत राखली होती. बेंगळूरच्या फुटबॉल स्टेडियमवर रविवारी शौकीनांना उभय देशातील पुन्हा कडवी चुरस पाहण्याची संधी लाभली आहे. फिफाच्या ताज्या मानांकन यादीत भारत 150 व्या तर पाकिस्तान 165 व्या स्थानावर आहे. ही फुटबॉल मालिका जेएसडब्ल्यु उद्योग समूहाने पुरस्कृत केली आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व सुनील छेत्री करणार आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा बंदोबस्‍ताचे छायाचित्र