आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Pakistan In U 19 World Cup Quarterfinal

विश्वचषक स्पर्धा : सेमीफायनलसाठी टीम इंडियाची टक्कर होणार पाकिस्तानशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाऊनसिल्ले - टाउन्सव्हॅली (ऑस्ट्रेलिया)- पी. चोप्रा (58) आणि जालन्याचा विजय झोल (72) यांच्या झुंजार अर्धशतकी खेळीनंतर वेगवान गोलंदाज रविकांतसिंगने घेतलेल्या पाच विकेटच्या बळावर भारताने 19 वर्षांखालील खेळाडूंच्या वर्ल्डकपची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. गुरुवारी झालेल्या लढतीत भारताने पापुआ आणि न्यू गिनी संघाला 107 धावांनी नमवित पुढच्या फेरीत प्रवेश केला.
रविकांतची भेदक गोलंदाजी- रविकांतने अतिशय जबरदस्त स्विंग गोलंदाजीचे प्रदर्शन करताना पापुआ आणि न्यू गिनी टीमला अवघ्या 32 षटकांत 97 धावांत गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. तत्पूर्वी, युवा इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 204 धावांचा स्कोअर उभा केला होता.
कोलकात्याचा 19 वर्षीय रविकांतने 9 षटकांत 2 निर्धाव टाकत 21 धावांत 5 गडी बाद केले. त्याने विरोधी संघाचे डी. बाऊ, एस. बाऊ, वागी ओआला, सी. सोपर अणि वागी मोरीआ यांना बाद केले. त्याच्या भेदक गोलंदाजीपुढे पापुआ आणि न्यू गिनी टीमची अवस्था अवघ्या 19 षटकांत 5 बाद 54 अशी संकटमय झाली होती. रविकांतशिवाय के. पस्सीने आणि बाबा अपराजीतने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. विकास मिर्शाला एकच विकेट घेता आली.
तत्पूर्वी, विजय झोल आणि प्रशांत चोप्राच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने कसाबसा 200 चा टप्पा ओलांडला. या दोघांशिवाय समित पटेलने 30 धावांची खेळी केली. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार उन्मुक चंद अवघ्या 4 धावा काढून बाद झाला. तिसर्‍या क्रमांकावर आलेला अपराजीतही (14) मोठी खेळी करू शकला नाही. यानंतर भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. विजय झोल आणि समित पटेल यांनी सहाव्या गड्यासाठी 82 धावांची उपयुक्त भागीदारी केली. पटेल 39 व्या षटकात बाद झाला.
विजयच्या खेळीने भारताचा डाव सावरला- पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या विजय झोलने 95 चेंडूंचा सामना करताना 72 धावा काढल्या. त्याने 8 चौकार ठोकले. 129 मिनिटे खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करताना त्याने भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट 75.78 असा होता.
विजय चांगल्या फॉर्मात..- विश्वचषक भारतातच येणार आहे. विजय सध्या चांगला फॉर्मात आहे. त्याच्या आजच्या अर्धशतकाने भारत जिंकला याचा अधिक आनंद आहे. येत्या सामन्यांत तो स्पध्रेत आणखी चांगली कामगिरी करू शकतो. अँड. हरीश झोल, विजय झोलचे वडील.
धावफलक
भारत धावा चेंडू 4 6
पी. चोप्रा त्रि. गो. मॉरे 58 79 7 0
चांद झे. केंट गो. सोपेर 4 2 1 0
अपराजित धावबाद 14 21 1 0
विहारी पायचीत गो. टॉम 6 13 0 0
विजय झोल झे.डी.बाऊ गो. सोपेर 72 95 8 0
एडी.नाथ त्रि.गो. टॉम 1 5 0 0
पटेल झे. बोगे गो. होडा 30 39 2 1
पसी त्रि.गो. सोपेर 0 1 0 0
मिर्शा पायचीत गो. सोपेर 0 4 0 0
रविकांत पायचीत गो. सोपेर 3 11 0 0
एस. शर्मा नाबाद 0 4 0 0
अवांतर : 16. एकूण : 45.1 षटकांत सर्व बाद 204 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-5, 2-49, 3-73,4-95,5-98,6-180,7-180,8-181.
गोलंदाजी : आरसी होडा 8-0-38-1, सीए सोपेर 7.1-0-32-5,वागी मॉरे 10-0-38-1, टी टॉम 10-1-26-2, सीएन केंट 2-0-18-0, एस बाऊ 4-0-23-0, अमिनी 4-0-29-0.
पापुआ आणि न्यू गिनी धावा चेंडू 4 6
सिका झे. चांद गो. पसी 1 14 0 0
एस.बाऊ झे. पटेल गो. रविकांत 14 49 1 0
केंट झे. रविकांत गो. मिर्शा 27 29 2 2
डी. बाऊ झे.पटेल गो. रविकांत 3 15 0 0
ऑला झे. विहारी गो. रविकांत 1 4 0 0
अमिनी झे. विहारी गो. अपरजित 28 18 2 2
एन बोगे झे. पटेल गो. पसी 7 21 0 0
सोपेर झे. पटेल गो. रविकांत 2 15 0 0
टॉम झे. चोप्रा गो. अपराजित 6 21 1 0
मॉरे झे. विहारी गो. रविकांत 0 2 0 0
होडा नाबाद 0 2 0 0
अवांतर : 8. एकूण : 31.5 षटकांत सर्व बाद 97 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-7, 2-42, 3-50,4-53,5-54,6-89,7-89,8-93,9-93.
गोलंदाजी : संदीप शर्मा 5-1-8-0, पसी 6-1-18-2,विकास मिर्शा 6-1-33-1, रविकांत सिंग 9-2-21-5, अपराजित 5.5-2-16-2.

टी-२०विश्वआचषकासाठी टीम इंडिया घोषित; युवीचे पुनरागमन
टीम इंडियाच्या विजयाचे हे चार खेळाडू ठरले शिलेदार