आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताकडे संधी होती, पराभवाची भीती नव्हती -स्मिथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - श्वास रोखून धरायला लावणार्‍या पहिल्या कसोटीनंतर अनेक प्रश्न उभे राहिलेत. हरण्याच्या भीतीपोटीच द. आफ्रिकेने अचानक बचावात्मक पवित्रा घेतला, असे जाणकार सांगतात. मात्र, कर्णधार स्मिथला तसे अजिबात वाटत नाही. आम्हाला पराभवाची भीती शिवलीसुद्धा नाही, असे उत्तर त्याने दिले आहे.
द. आफ्रिका जिंकली असती तर तो एक महाविक्रमच झाला असता. कारण दुसर्‍या डावात इतके मोठे आव्हान आजपर्यंत कुणीच गाठलेले नाही. अवघ्या 8 धावांनी आफ्रिकन सिंहांना विजयाने हुलकावणी दिली. एक वेळ यजमानच हा सामना जिंकतील, असे वाटत होते. मात्र, डुप्लेसिस धावबाद होताच सामन्याला कलाटणी मिळाली. स्मिथनेही हे मान्य केले. आम्हाला पराभवाची भीती नव्हतीच, असे स्मिथ म्हणाला. आमच्या प्रमाणे भारतालाही या सामन्यात विजयाची दाट शक्यता तर भारताची होती. आम्ही फक्त खेळत गेलो, असेही तो म्हणाला.