आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसोटी: आफ्रिकेच्या 5 बाद 299 धावा, कॅलिसने सावरला डाव !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्बन - कसोटीतून निवृत्ती जाहीर करणा-या जॅक कॅलिसने (78) नाबाद अर्धशतक ठोकून शनिवारी यजमान दक्षिण आफ्रिका टीमचा डाव सावरला. रवींद्र जडेजाच्या (4/87) गोलंदाजीमुळे यजमान टीमला दुस-या कसोटीच्या पहिल्या डावात पाच गड्यांच्या मोबदल्यात 299 धावांपर्यंत मजल मारता आली. अद्याप पाहुणा भारतीय संघ 35 धावांनी आघाडीवर आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. कॅलिस आणि डेल स्टेन खेळत आहेत.
यजमान संघाने बिनबाद 82 धावांवरून शनिवारी तिस-या दिवशी खेळायला सुरुवात केली. स्मिथ (47) आणि पीटरसनने (62) टीमला 101 धावांची सलामी दिली. दरम्यान, रवींद्र जडेजाने ही जोडी फोडली. त्याने स्मिथला शिखर धवनकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ मोहंमद शमीने हाशिम आमला (3) आणि जडेजाने पीटरसनला (62) बाद केले. पीटरसनने 100 चेंडूंत आठ चौकारांसह 62 धावा काढल्या.
कॅलिस-डिव्हिलर्सची शतकी भागीदारी
चौथ्या क्रमांकावर आलेल्या कॅलिसला डिव्हिलर्सने चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी करताना संघाची बाजू सावरली. डिव्हिलर्सने 117 चेंडूंत 74 धावा काढल्या. दरम्यान, जडेजाने ही जोडी फोडली. त्याने डिव्हिलर्सला बाद केले. त्यानंतर जेपी डुमिनीची कॅलिसला चांगली साथ मिळाली. डुमिनीने 28 धावा काढल्या. यासह त्याने कॅलिससोबत पाचव्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी केली.
रवींद्र जडेजाचे
चार बळी
भारताकडून रवींद्र जडेजाने गोलंदाजीत तिसरा दिवस गाजवला. त्याने यजमान टीमच्या अव्वल चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जडेजाने स्मिथ, हाशिम आमला, डिव्हिलर्स आणि जेपी डुमिनीला बाद केले. त्याने 87 धावा देत चार विकेट घेतल्या. मोहंमद शमीने 62 धावा देत एक गडी बाद केला.
जॅक कॅलिसला ‘गार्ड ऑफ ऑनर’
निवृत्ती जाहीर करणारा दक्षिण आफ्रिकेचा स्टार ऑलराउंडर जॅक कॅलिसला शनिवारी डर्बन येथे दुस-या कसोटीत भारतीय खेळाडूंनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. यजमान दक्षिण आफ्रिका टीमचा दुसरा गडी बाद झाल्यानंतर कॅलिसने मैदानावर प्रवेश केला. फलंदाजीसाठी मैदानावर विराजमान झालेल्या कॅलिसचे चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. या वेळी पंच स्टीव्ह डेव्हिस आणि रोड टकर यांनीदेखील दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचे स्वागत केले. या वेळी मोठ्या प्रमाणात चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याच पाठिंब्याच्या बळावर कॅलिसने सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले.
धावफलक
भारत पहिला डाव 334 धावा.
द.आफ्रिका पहिला डाव धावा चेंडू 4 6
स्मिथ झे. धवन गो. जडेजा 47 81 7 0
ए. पीटरसन झे. विजय गो. जडेजा 62 100 8 0
आमला त्रि. गो. शमी 03 18 0 0
जॅक कॅलिस नाबाद 78 224 10 0
डिव्हिलर्स झे. कोहली गो. जडेजा 74 117 9 0
जेपी डुमिनी पायचीत गो. जडेजा 28 82 4 0
डेल स्टेन नाबाद 00 07 0 0
अवांतर : 7. एकूण : 104.5 षटकांत 5 बाद 299 धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-103, 2-113, 3-113, 4-240, 5-298. गोलंदाजी : जहीर खान 16-2-46-0, मो. शमी 19-2-62-1, ईशांत शर्मा 23-7-76-0, रवींद्र जडेजा 37-9-87-4, रोहित शर्मा 9-5-1-22-0.


'स्‍टेन'गनपुढे शरणागती... वाचा पुढे...