आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second Test Match India Vs South Africa, India Made 334 Runs

दुसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात 334 धावा; मुरलीचे शतक हुकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्बन - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने (6/100) भारतीय संघाची दुस-या कसोटीच्या पहिल्या डावात शुक्रवारी दाणादाण उडवली. भारताकडून अजिंक्य रहाणेने (51) नाबाद अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या बळावर भारताने 111.3 षटकांत 334 धावांची खेळी केली. सलामीवीर मुरली विजयचे (97) शतक हुकले.
दक्षिण आफ्रिकेने प्रत्युत्तरात 82 धावा काढल्या. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा पीटरसन 46 आणि कर्णधार स्मिथ 35 धावांवर खेळत होते. यजमान टीम अद्याप 252 धावांनी पिछाडीवर आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे तीन तासांनंतर उशिरा दुस-या दिवशी खेळाला सुरुवात झाली. भारताने 1 बाद 181 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. मुरली विजय व पुजाराने दुस-या विकेटसाठी 157 धावांची भागीदारी पूर्ण केली. मात्र, पुजाराला डेल स्टेनने बाद केले. त्याने 132 चेंडूंत नऊ चौकारांसह 70 धावा काढल्या. त्यापाठोपाठ शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुरली विजयला आणि रोहित शर्माला स्टेनने बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणेने कंबर कसली. त्याने पाचव्या विकेटसाठी विराट कोहलीसोबत 66 धावांची भागीदारी केली. मात्र, मोर्केलने कोहलीला (46) झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार धोनीने (24) रहाणेसोबत 55 धावांची भागीदारी करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. दरम्यान, स्टेनने धोनीला (24) स्मिथकरवी झेलबाद केले.
डिव्हिलर्सचे पाच झेल : यष्टिरक्षक डिव्हिलर्सने पाच झेल घेण्याचा पराक्रम केला. त्याने विजय, पुजारा, विराट कोहली, जहीर आणि ईशांतचे झेल घेतले.
धावफलक
पहिला दिवस 1 बाद 181 धावांच्या पुढे
भारत पहिला डाव धावा चेंडू 4 6
विजय झे. डिव्हिलर्स गो. स्टेन 97 226 18 0
पुजारा झे. डिव्हिलर्स गो. स्टेन 70 132 9 0
कोहली झे. डिव्हिलर्स गो. मोर्केल 46 87 5 0
रोहित शर्मा त्रि. गो. स्टेन 00 01 0 0
अजिंक्य रहाणे नाबाद 51 121 8 0
धोनी झे. स्मिथ गो. स्टेन 24 40 3 0
जडेजा झे. कॅलिस गो. डुमिनी 00 03 0 0
जहीर झे. डिव्हिलर्स गो. स्टेन 00 02 0 0
ईशांत झे. डिव्हिलर्स गो. स्टेन 04 03 1 0
मो. शमी झे. स्मिथ गो. मोर्केल 01 06 0 0
अवांतर : 12. एकूण : 111.3 षटकांत सर्वबाद 334 धावा. गोलंदाजी : डेल स्टेन 30-9-100-6, वेर्नोन फिलेंडर 21-6-56-0, मोर्केल 23.3-6-50-3, कॅलिस 11-1-36-0, पीटरसन 22-2-75-0, डुमिनी 4-0-10-1.
द.आफ्रिका पहिला डाव धावा चेंडू 4 6
गॅ्रमी स्मिथ नाबाद 35 59 5 0
ए. पीटरसन नाबाद 46 61 7 0
अवांतर : 1. एकूण : 20 षटकांत बिनबाद 82 धावा. गोलंदाजी : जहीर खान 4-0-20-0, मो. शमी 5-0-23-0, ईशांत शर्मा 6-2-18-0, रवींद्र जडेजा 5-1-20-0.
स्टेनचा ‘षटकार’
षटक खेळाडू
66.3 चेतेश्वर पुजारा
68.5 मुरली विजय
68.6 रोहित शर्मा
106.4 महेंद्रसिंग धोनी
108.2 जहीर खान
108.5 ईशांत शर्मा