आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs South Africa First Test Day Five Updates

शमीने उडवला ड्युमिनीचा त्रिफळा, सामन्‍याला कलाटणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्‍सबर्ग- वॉंडरर्स मैदानावर सुरु असलेला पहिला कसोटी सामना रंगतदार अवस्‍थेत आला आहे. इशांत शर्मा आणि मोहम्‍मद शमीने दोन झटपट बळी घेऊन सामन्‍याला कलाटणी दिली आहे. फॅफ ड्युप्‍लेसिसपाठोपाठ ए. बी. डिव्‍हीलियर्सनेही झुंझार शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्‍यानंतर इशांत शर्माच्‍या गोलंदाजीवर तो बाद झाला. परंतु, तोपर्यंत त्‍याने दक्षिण आफ्रिकेला विजयाच्‍या उंबरठ्यावर पोहोचविले आहे. त्‍याने ड्युप्‍लेसिससोबत 205 धावांची झुंझार भागीदारी केली. डिव्‍हीलियर्स 103 धावांवर बाद झाला. इशांतचा चेंडू त्‍याने स्‍टंपवर ओढावून घेतला. त्‍यानंतर आलेला जे. पी. ड्युमिनीही 5 धावांवर बाद झाला. शमीच्‍या गोलंदाजीवर ड्राईव्‍ह करताना त्‍यानेही चेंडू स्‍टंपवर ओढावून घेतला.

डिव्‍हीलियर्स आणि फॅफ ड्युप्‍लेसिस या जोडीने दमदार दीडशतकी भागीदारी करुन दक्षिण आफ्रिकेसाठी विजयाची संधी निर्माण केली. ड्युप्‍लेसिसने उपहारानंतर झुंझार शतक पूर्ण केले. त्‍याने 252 चेंडुंचा सामना करुन 12 चौकारांच्‍या साह्याने शतक पूर्ण केले. डिव्‍हीलियर्सही शतकाच्‍या जवळ पोहोचला आहे. चहापानाला खेळ थांबला त्‍यावेळेस दक्षिण आफ्रिकेची 4 बाद 331 अशी स्थिती होती.

तत्‍पुर्वी, झहीर खानने अनुभवी जॅक कॅलिसचा कडवा प्रतिकार मोडून काढला. कॅलिसला त्‍याने 34 धावांवर पायचीत केले. कॅलिसला बाद करुन त्‍याने कसोटीमध्‍ये 300 बळींचा टप्‍पा पूर्ण केला. कॅलिस बाद झाल्‍यानंतर ए. बी डिव्‍हीलियर्स आणि फॅफ ड्युप्‍लेसिस या जोडीने डाव सावरला. उपहारापर्यंत दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 236 धावांपर्यंत मजल मारली होती. उपहारानंतर डिव्‍हीलियर्सने आक्रमक पावित्रा घेतला. त्‍यामुळे दक्षिण आफ्रिकेची धावगती वाढली. भारतावर मात्र दडपण आले आहे. ही भागीदारी मोडणे अतिशय आवश्‍यक झाले आहे.


आणखी वाचा पुढे...