आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडर्बन- भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका कसोटीच्या शेवटच्या दिवशी 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी एकही गडी न गमावता 59 धावा केल्या आहेत. अखेरची कसोटी खेळणा-या जॅक केलिसला दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी विजयी निरोप दिला आहे. एकही गडी न गमावता त्यांनी 59 धावा करुन 10 विकेट्सनी भारताचा पराभव केला आहे. यासोबतच दक्षिण अफ्रिकेने 1-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे.
त्याआधी, उदयोन्मुख फलंदाज अजिंक्य रहाणेने एकाकी खिंड लढवत झुंझार 96 धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. बाद होणारा तो भारताचा शेवटचा फलंदाज होता. भारताचा डाव 223 धावांवर आटोपला.
58 धावांचे लक्ष्य दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी 11.4 ओव्हरमध्ये लिलया पार केले.
अजिंक्य रहाणेच्या झुंझार खेळीमुळे भारताला डावाने पराभव टाळता आला. त्याने 2 षटकार आणि 11 चौकारांसह 96 धावांची एक अविस्मरणीय खेळी केली. परंतु, शतक पूर्ण करण्यासाठी मोठा फटका मारण्याचा मोह तो आवरु शकला नाही. व्हर्नन फिलंडरच्या षटकात त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. त्यानंतरच्या चेंडुवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याचा त्रिफळा उडाला. डेल स्टेन आणि फिलँडर यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर रॉबिन पीटरसनने सर्वाधिक 4 फलंदाज बाद केले. पीटरसनने काल खेळ संपल्यानंतर विजयाची शक्यता वर्तविली होती. एका दिवसात भारताचे सर्व फलंदाज बाद होऊ शकतात, असे तो म्हणाला होता. त्याचा अंदाज खरा ठरला. दोन सत्रही भारतीय फलंदाज तग धरु शकले नाही.
डेल स्टेनने इशांत शर्माला बाद करुन कसोटी क्रिकेटमध्ये 350 बळींचा टप्पा गाठला. सर्वात जलद हा टप्पा गाठणारा तो दुसरा गोलंदाज ठररला. पहिल्या क्रमांकावर मुथैय्या मुरलीधरन आहे.
'स्टेन'गनपुढे फलंदाज धाराशयी... वाचा पुढे...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.