आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs South Africa Second Test Day Four Updates

शेवटच्‍या कसोटीक कॅलिसचे ऐतिहासिक शतक, आफ्रिकेच्‍या पहिल्‍या डावात 500 धावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डरबन- दक्षिण आफ्रिकेने रविवारी चौथ्या दिवशी 5 बाद 299 धावांवरून खेळायला सुरुवात केली. कॅलिसने संयमी खेळी करताना शानदार शतक पूर्ण केले. यासह त्याने डेल स्टेनसोबत (44) सहाव्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. कॅलिसने 316 चेंडूंत 13 चौकारांसह 115 धावा काढल्या. रवींद्र जडेजाने कॅलिसला बाद करून टीम इंडियाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. यासह जडेजाने सामन्यातील सहा बळीही पूर्ण केले.


पीटरसनचे अर्धशतक
आठव्या क्रमांकावर आलेल्या फाफ डु प्लेसिस आणि रॉबिन पीटरसनने संघाची बाजू सावरली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी 110 धावांची भागीदारी केली. याच्या बळावर आफ्रिकेने धावसंख्येचा आलेख उंचावला. पीटरसनने 52 चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने 61 धावा काढल्या. त्याला जहीर खानने बाद केले. त्या पाठोपाठ डु प्लेसिस 43 धावा काढून तंबूत परतला.

डर्बनमध्ये असाही योगायोग
जॅक कॅलिस आणि डर्बन यांच्यात एक वेगळाच योगायोग जुळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कॅलिसने याच ठिकाणी डिसेंबर 1995 मध्ये कसोटी करिअरला प्रारंभ केला होता. त्याने या सामन्यात एक धाव काढली होती. आता शेवटच्या कसोटीत त्याने 115 धावा काढून अनोखा योगायोग जुळवून आणला. त्याची ही शेवटची कसोटी आहे.


राहुल द्रविडला टाकले मागे
कॅलिसने दुसर्‍या कसोटीत 115 धावांची खेळी करत करिअरमधील 45 वे शतक ठोकले. यासह कॅलिसने कसोटीत सर्वाधिक धावांमध्ये भारताच्या राहुल द्रविडला पिछाडीवर टाकले. त्याने 166 कसोटीत 13289 धावा पूर्ण केल्या. राहुल द्रविडच्या नावे 164 कसोटीत 13288 धावा आहेत.

रवींद्र जडेजा चमकला
भारतीय संघाच्या रवींद्र जडेजाने पहिल्या डावात शानदार कामगिरी केली. त्याने 138 धावा देत सहा विकेट घेतल्या. यामध्ये त्याने चौथ्या दिवशी शतकवीर कॅलिसचा महत्त्वाचा बळी मिळवून दिला. वेगवान गोलंदाज जहीर खानने दोन व मोहंमद शमीने एक विकेट घेतली.

धावफलक
भारत पहिला डाव 334 धावा.
द. आफ्रिका कालच्या 5 बाद 299 धावांच्या पुढे.
द.आफ्रिका पहिला डाव धावा चेंडू 4 6
कॅलिस झे. धोनी गो. जडेजा 115 316 13 0
स्टेन झे. धोनी गो. जहीर 44 94 7 0
डु प्लेसिस धावबाद रोहित शर्मा 43 70 4 0
आर. पीटरसन झे. विजय गो. जहीर 61 52 9 1
फिलेंडर नाबाद 00 03 0 0
मोर्केल नाबाद 00 02 0 0
अवांतर : 23. एकूण : 155.2 षटकांत सर्वबाद 500 धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-103, 2-113, 3-113, 4-240, 5-298, 6-384, 7-387, 8-497, 9-500, 10-500. गोलंदाजी : जहीर खान 28-4-97-2, मो. शमी 27-2-104-1, ईशांत शर्मा 31-7-114-0, रवींद्र जडेजा 58-15-138-6, रोहित शर्मा 11-1-29-0.
भारत दुसरा डाव धावा चेंडू 4 6
धवन झे. प्लेसिस गो. पीटरसन 19 87 2 0
विजय झे. स्मिथ गो. फिलेंडर 06 13 1 0
चेतेश्वर पुजारा नाबाद 32 90 4 0
विराट कोहली नाबाद 11 26 1 0
एकूण : 36 षटकांत 2 बाद 68 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-8, 2-53. गोलंदाजी : डेल स्टेन 7-5-5-0, फिलेंडर 6-2-9-1, मोर्केल 6-2-11-0, आर. पीटरसन 9-2-23-1, डुमिनी 8-2-20-0.चौथ्‍या दिवशीच्‍या खेळाची काही क्षणचित्रे पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...