आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडर्बन - पहिल्या कसोटीत यजमान आफ्रिकेला तुल्यबळ झुंज दिल्यानंतर दुस-या कसोटीत टीम इंडियाने शानदार सुरुवात केली. अंधूक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ थांबला तोपर्यंत भारताने प्रथम फलंदाजी करताना 61 षटकांत 1 बाद 181 धावा काढल्या होत्या. त्या वेळी सलामीवीर मुरली विजय 91 तर चेतेश्वर पुजारा 58 धावांवर खेळत होते.
वेगवान गोलंदाजांना साथ देणा-या डर्बनच्या खेळपट्टीवर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. भारताचे सलामीवीर शिखर धवन (29) आणि मुरली विजय यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी 13.1 षटकांत 41 धावांची सलामी दिली. तेराव्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक झाला. ब्रेकनंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर शिखर धवन बाद झाला. ड्रिंक्स ब्रेकमुळे त्याची लय तुटल्याचे जाणवत होते. मोर्ने मोर्केलच्या गोलंदाजीवर पीटरसनने त्याचा झेल घेतला. भारताच्या 41 धावा झाल्या असतानाच शिखर धवन बाद झाला. शिखर धवनने चांगली सुरुवात केली. मात्र, त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने 49 चेंडूंचा सामना करताना 4 चौकारांच्या साह्याने 29 धावा काढल्या. जेवणाच्या ब्रेकपर्यंत भारताने 26 षटकांत 1 बाद 76 धावा काढल्या होत्या. त्यावेळी मुरली विजय 33 तर पुजारा 13 धावांवर खेळत होते.
पुजारा-विजयची भागीदारी
धवन बाद झाल्यानंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास परतला. मात्र, त्यांचा हा उत्साह फार काळ टिकला नाही. यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी आफ्रिकन गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. आफ्रिकेच्या तोफखान्याचा समर्थपणे सामना करताना मुरली विजयने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले. विजयने 102 चेंडूंचा सामना करताना 11 चौकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या. मुरली विजय आणि पुजारा यांनी 176 चेंडूंत 100 धावांची भागीदारी पूर्ण केली. मात्र, अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला तोपर्यंत ही भागीदारी 140 धावांपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी मुरली विजय 91 तर चेतेश्वर पुजारा 58 धावांवर खेळत होते. त्यावेळी भारताच्या 181 धावा झाल्या होत्या. विजयने 201 चेंडूंचा सामना करताना 17 चौकारांच्या मदतीने ही खेळी केली.
अश्विन बाहेर जडेजा आत.. वाचा पुढे...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.