भारत विरुध्द श्रीलंका यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या एकदिवसीय लढतीत श्रीलंका संघाने विजय मिळवला. श्रीलंकेने भारताचा 2 गड्यांनी पराभव केला. अजंथा मेंडिसच्या (4/60), सेनानायके (3/41) यांच्या धारदार गोलंदाजीपाठोपाठ कुमार संगकाराच्या (103) शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेविरुद्ध सामन्यात 9 बाद 264 धावा काढल्या. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाने 49.2 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. संगकाराशिवाय सलामीवीर कुशल परेरा (64) आणि टी.परेराच्या नाबाद 11 धावांमुळे श्रीलंकेने भारतीय संघावर विजय मिळवला.
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि वाचा, भारताच्या पराभवात महत्वाची भूमिका बजावणारे खेळाडू...