आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs West Indies Match News In Marathi, T 20 World Cup, Cricket

टी-20 विश्‍वचषक: भारतासमोर आज कॅरेबियनचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - टी-20 वर्ल्डकप क्रिकेटच्या ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानवर मात केल्यानंतर आता टीम इंडियापुढे रविवारी गतचॅम्पियन वेस्ट इंडीजचे मजबूत आव्हान असेल. ग्रुप 2 मध्ये पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामनासुद्धा रविवारीच होईल.


भारतासाठी आव्हान
० क्रिस गेलची आक्रमक फलंदाजी आणि जादुई फिरकीपटू सुनील नरेनच्या गोलंदाजीला रोखण्याचे कठीण काम असेल.
० वेस्ट इंडीजने दोन्ही सराव सामने जिंकून जबरदस्त फॉर्माची प्रचिती दिली आहे.
० वेस्ट इंडीज संघात क्रिस गेलशिवाय कर्णधार डॅरेन सॅमी, डेवेन स्मिथ, डेवेन ब्राव्हो, लेंडल सिमन्सच्या रूपाने मजबूत फलंदाजीची फळी आहे.
० गेल चांगली सुरुवात देऊ शकतो. तर मधल्या फळीत सॅमी धावा खेचण्यात सक्षम आहे.
भारताचे शक्तिस्थान
० विराट कोहली, सुरेश रैना सध्या शानदार फॉर्मात आहेत. पाकविरुद्ध दोघांनी स्वत:ला सिद्ध केले.
० गोलंदाजीत रवींद्र जडेजा, अमित मिश्रा आणि आर. अश्विनचे त्रिकूट कमाल करू शकते.
० कर्णधार महेंद्रसिंग धोनी मधल्या फळीत पाठीचा कणा आहे. तो वेस्ट इंडीजविरुद्ध मॅचविजेता कामगिरी करू शकतो.


भारताची दुबळी बाजू
० युवराज चांगल्या फॉर्मात नाही. पाकिस्तानविरुद्ध लढतीत तो केवळ 1 धाव काढून बाद झाला. शिवाय गोलंदाजीत एका षटकात त्याने 13 धावा मोजल्या.
० भुवनेश्वर कुमारने 3 झेल सोडले. क्षेत्ररक्षण करणा-या खेळाडूंत आपसातील संवादाची उणीव.
० सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माचे अपयश चिंतेची बाब ठरत आहे.


वर्ल्डकपमध्ये आज पाकसमोर कांगारूंचे आव्हान
भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघ आता दबावात आला आहे. रविवारी पाकिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाचे मजबूत आव्हान असेल. आयसीसी टी-20 स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवायचे असेल तर पाकला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे गरजेचे आहे.


संभाव्य संघ
पाकिस्तान संघ : मो. हाफिज (कर्णधार), शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल, उमर अकमल, शोएब मकसूद, अहमद शाहजाद, शोएब मलिक, सईद अजमल, उमर गुल, जुनैद खान, बिलावल भट्टी, मो. तल्हा, शार्जिल खान.
ऑस्ट्रेलिया संघ : जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅरोन फिंच, ब्रेड हॅडिन, ब्रेड हॉज, ब्रेड हॉग, डॅनियल क्रिस्टियन, डग बोलिंगर, नॅथन कुल्टर नाईल, जेम्स फ्युकनर, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, कॅमरून व्हाइट, शेन वॉटसन, मुईरहेड.


संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मो. शमी, भुवनेश्वर कुमार, मिश्रा.
वेस्ट इंडीज : डॅरेन सॅमी (कर्णधार), डेवेन ब्राव्हो, एस. बद्री, जोनाथन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, क्रिस गेल, सुनील नरेन, रवी रामपॉल, एस. सॅम्युअल्स, लेंडल सिमन्स, के. संतोकी, डी. रामदीन.


रोखून दाखवा...
रैनाने आमच्या संघावर टीका केली आहे. षटकार मारण्यापासून आम्हाला आता भारतीयांनी रोखूनच दाखवावे, असे आव्हान विंडीजचा कर्णधार सॅमीने पत्रकार परिषदेत दिले. विंडीजच्या फलंदाजांना फिरकीपुढे स्ट्राइक रोटेट करता येत नाही, अशी टीका सुरेश रैनाने केली होती. त्यावर सॅमीने तोडीस तोड उत्तर दिले.