नवी दिल्ली -'हुदहुद' वादळामुळे भारत विरुध्द वेस्ट इंडिज दरम्यानचा तिसरा एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी विशाखापट्टनम येथे खेळला जाणार होता. त्यामुळे ही एकदिवसीय क्रिकेट मालिका आता चारच सामन्यांची झाली आहे.
तीन दिवसांपूर्वी मिळाली सूचना
भारतीय हवामानखात्याने 'हुदहूद' या चक्रीय वादळाची तीन दिवसांपूर्वीच सूचना दिली होती. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडह (बीसीसीआय)ने मॅच दुसरीकडे स्थलांतरीत करण्याविषयी भूमिका घेतली नाही. रविवारी वादळ आंध्रपदेश आणि ओडिशामध्ये धडकले.
स्थानिक संघटना लढत आयोजित करण्यासंबंधी तयार होती, मात्र बीसीसीआयने धोका पत्करण्याचा निर्णय घेतला. तिसरा वनडे रद्द झाल्याने आता दोन्ही देशांत चार वनडे सामन्यांची मालिका होईल. पुढील वनडे १७ ऑक्टोबर रोजी कोलकात्यात हाेईल.