आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक स्पर्धा : विजयासह भारत पाचव्या स्थानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - अंकुश बैन्स (74), संजू सॅमसन (67) आणि श्रेयस अय्यर (66) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर भारताच्या 19 वर्षांखालील संघाने विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजवर 46 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 340 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा डाव 294 धावांत संपुष्टात आला. अर्धशतक झळकावणारा अंकुश बैन्स सामनावीर ठरला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 बाद 340 धावा काढल्या. सलामीवीर अंकुश बैन्स (74) आणि अखिलने (27) 70 धावांची दमदार सलामी दिली. विजय झोलने 30 धावा काढल्या. संजू सॅमसनने 72 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 5 षटकार खेचत शानदार 66 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने 66 व दीपक हुडाने 42 धावा काढल्या.

संक्षिप्त धावफलक : भारत : 8 बाद 340 वेस्ट इंडीज : 8 बाद 294 .

झोलची अष्टपैलू कामगिरी
भारतीय संघाचा कर्णधार विजय झोलने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने 32 चेंडूंचा सामना करताना 4 चौकारांच्या मदतीने 30 धावा काढल्या. त्याने 1 षटकात 3 धावा देत 1 बळीदेखील घेतला. त्याने विंडीजतर्फे शतक ठोकणार्‍या सलामीवीर टी. चंद्रपॉलला पायचीत करत महत्त्वपूर्ण विकेट घेतली.