आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा मालिका विजय, झिम्‍बाब्‍वेवर दणदणीत मात; मिश्रा सामनावीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे - रविवारी भारताने झिम्बाब्वेला तिस-या वनडेत 7 गड्यांनी पराभूत करून विजयी हॅट्ट्रिक केली. यासह टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध मालिका विजय साजरा केला असून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आपली आघाडी झाली आहे. भारताच्या विजयाचे हीरो अमित मिश्रा (47 धावांत 4 विकेट) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद 68) हे दोघे ठरले.


भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करून यजमान संघाला अवघ्या 183 धावांत गुंडाळले. यानंतर भारताने 35.3 षटकांत 3 बाद 187 धावा काढून विजय मिळवला. भारताची सुरुवात या वेळीही चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा फक्त 14 धावा काढून बाद झाला. त्याच्या जागी खेळण्यास आलेल्या विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. कोहलीने सलामीवीर शिखर धवन (35) दुस-या विकेटसाठी 40 तर अंबाती रायडूसोबत (33) तिस-या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. शिखर धवन आणि रायडू बाद झाल्यानंतर विराटने सुरेश रैनाच्या (नाबाद 28) साथीने भारताला 36 व्या षटकात विजय मिळवून दिला. भारताकडून रैनाने विजयी चौकार मारला.


अमित मिश्राच्या फिरकीची जादू
तत्पूर्वी लेगस्पिनर अमित मिश्राच्या फिरकीच्या जादूमुळे भारताने झिम्बाब्वेला 46 षटकांतच गारद केले. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा कर्णधार कोहलीचा निर्णय योग्य ठरला. झिम्बाब्वेने सुरुवातीच्या दोन षटकांतच दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. नंतर यजमान संघ अखेरपर्यंत संघर्ष करीत होता. अमित मिश्राने हॅमिल्टन मसकदजा (38), मॅक्लम वॉलर (0), तेंदई चतारा (23) आणि ब्रायन विटोरी (17) यांना पॅव्हेलियनमध्ये परतवले.


मालिका विजय महत्त्वाचा : कोहली
ही मालिका खूप महत्त्वाची होती. गोलंदाजीच्या वेळी आम्हाला सुरुवातीला जे यश मिळाले, त्याचा फायदा झाला. आमच्यासमोर खूप कठीण असे लक्ष्य नव्हते. यामुळे लक्ष्य गाठताना फार अडचण आली नाही. या सामन्यापूर्वी आम्ही लक्ष्य ठेवून खेळत नव्हतो. आज मालिका विजय साजरा करायचा आहे, असासुद्धा विचार केला नव्हता. झिम्बाब्वेकडे चांगले खेळाडू आहेत यामुळे आम्ही त्यांना सहज घेतले नाही, अशी प्रतिक्रिया कोहलीने व्यक्त केली.


04 विकेट अमित मिश्राने घेतल्या
19.4 षटक मसकदजा
झेलबाद, कार्तिककरवी 19.5 षटक वॉलर पायचीत
41.6 षटक विटोरी झेलबाद, कार्तिककरवी
45.6 षटक चतारा त्रिफळाचीत
एकूण 10-0-47-4


छान झाले...
गोलंदाजीबाबत मी आमच्या प्रशिक्षकासमवेत वारंवार बोललो. धावाचा विचार न करता विकेट घेण्याचा प्रयत्न कर, असे त्यांनी मला सांगितले. मी गुगलीवर खूप मेहनत घेतली. याचा फायदा झाला. या सामन्यात सर्वच छान आणि मनासारखे घडले.
अमित मिश्रा, सामनावीर


कोणाविरुद्ध किती मालिका
विरुद्ध मालिका विजय पराभव बरोबरी
ऑस्ट्रेलिया 06 02 04 00
बांगलादेश 02 02 00 00
इंग्लंड 15 06 06 03
आयर्लंड 01 01 00 00
न्यूझीलंड 10 05 03 02
पाकिस्तान 17 05 11 01
स्कॉटलंड 01 01 00 00
द. आफ्रिका 09 05 03 01
श्रीलंका 15 10 02 03
वेस्ट इंडीज 15 07 08 00
झिम्बाब्वे 07 06 01 00
एकूण 98 50 38 10


धावफलक
झिम्बावे धावा चेंडू 4 6
सिबंदा झे. धवन गो. विनय 0 3 0 0
रजा झे.कार्तिक गो.शमी 1 3 0 0
मसकदजा झे.कार्तिक गो.मिश्रा 38 53 5 0
टेलर झे. शमी गो. उनादकट 23 44 3 0
सिन विल्यम्स धावबाद 45 53 2 1
वॉलर पायचीत गो. मिश्रा 0 1 1 0
चिगुंबुरा पायचीत गो. जडेजा 3 8 0 0
उत्सया झे. कार्तिक गो. शमी 10 38 1 0
चतारा त्रि. गो. मिश्रा 23 42 2 1
विट्टोरी झे. कार्तिक गो. मिश्रा 17 26 2 1
चिनोयो नाबाद 6 7 1 0


अवांतर : 17. एकूण : 46 षटकांत सर्वबाद 183. गडी बाद होण्याचा क्रम : 1-0, 2-2, 3-67, 4-80, 5-80, 6-89, 7-125, 8-133, 9-167, 10-183. गोलंदाजी : विनयकुमार 7-0-32-1, मो. शमी 9-0-25-2, उनादकट 7-0-24-1, कोहली 1-0-7-0, जडेजा 10-2-39-1, रैना 2-0-4-0, अमित मिश्रा 10-0-47-4.


भारत धावा चेंडू 4 6
रोहित झे. टेलर गो. चिनोयो 14 21 2 0
धवन झे. सिबंदा गो. चतारा 35 32 5 0
विराट कोहली नाबाद 68 88 5 1
रायडू झे. व गो. विट्टोरी 33 54 2 0
सुरैश रैना नाबाद 28 18 3 0


अवांतर : 9. एकूण : 35.3 षटकांत 3 बाद 187. गडी बाद होण्याचा क्रम : 1-27, 2-67, 3-131. गोलंदाजी : विट्टोरी 8-0-53-1, चिनोयो 7-0-36-1, चतारा 7.3-1-34-0, उत्सया 10-0-41-0, चिगुंबुरा 3-0-21-0.