आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-झिम्बाब्वे दुसरा वनडे आज, कोहलीच्‍या कामगिरीकडे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे - भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा वनडे सामना शुक्रवारी होईल. पहिल्या वनडेत भारताने 6 गड्यांनी विजय मिळवला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या 1-0 ने पुढे आहे.

झिम्बाब्वे दौर्‍यावरील भारतीय संघाचे सरासरी वय 23 वर्षे असून भारतीय खेळाडू मैदानावर जबरदस्त चपळ दिसत आहेत. धोनी संघात जो उत्साह असतो तोच उत्साह आतासुद्धा दिसत आहे. फलंदाजीत भारताची मदार रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जडेजा यांच्यावर असेल. दुसरीकडे भुवनेश्वरकुमारच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजी दुबळी वाटत आहे. पहिल्या सामन्यात विनयकुमार, जयदेव उनादकट आणि मो. शमी यांनी 141 धावा मोजल्या. फिरकीपटूंत दोन वर्षांनी संघात परतलेल्या अमित मिश्राने मागच्या सामन्यात 3 विकेट घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली. झिम्बाब्वेकडून पाकिस्तानी वंशाचा सिकंदर रजा आणि एल्टन चिगुंबराने मागच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला होता. झिम्बाब्वेचा संघ अपेक्षेनुसार थोडा दुबळा आहेच. मात्र, ऑफस्पिनर प्रॉस्पर उत्सयाने चांगली गोलंदाजी केली होती.