आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Want Progress In Ranking So Defeat Kangaroo : Navjyot Siddhu

भारताला क्रमवारीत प्रगती करायची असल्यास कांगारूंना हरवावे लागेल : नवज्योत सिद्धू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - भारताला कसोटी क्रिकेटमधील आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवायची असल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल. सुमार कामगिरीमुळे क्रमवारीत भारताची घसरण अव्वल स्थानावरून सहाव्या क्रमांकावर झाली आहे. ही मालिका भारतासाठी अग्निपरीक्षाच ठरेल.भारतासाठी बांगलादेश व दुस-या दुय्यम टीमला हरवण्यापेक्षा ऑस्ट्रेलियाचा पराभव करणे आवश्यक आहे, असा सल्ला आंतरराष्‍ट्री य क्रिकेटपटू व लोकप्रिय समालोचक नवज्योत सिद्धू यांनी दिला.

‘वर्ल्डकपनंतर दहा कसोटीत पराभूत होणे हे कोणत्याही टीमसाठी लाजिरवाणे आहे. हरणारी टीम क्रमवारीत अव्वल स्थानी असेल तर हा पराभव अधिक बोचरा ठरतो. इंग्लंडने 27 वर्षांनंतर शिवाय यजमान भारताला घरच्या मैदानावर हरवले. यामुळे आता भारतीय टीम ‘घर में शेर’ राहिलेली नाही, असे अनेकांना वाटत असल्याचे सिद्धू यांनी नमूद केले. अनुभवी खेळाडूंची उणीव भारताला जाणवेल, असेही त्यांनी म्हटले.
27 वर्षांनंतर इंग्लंडने यजमान भारताला घरच्या मैदानावर हरवले.

वर्ल्डकपनंतर कसोटीत भारताची कामगिरी

भारताचा 10 कसोटी पराभव
भारत पराभूत वि. इंग्लंड 0-4 (इंग्लंडमध्ये)
भारत पराभूत वि. ऑ स्ट्रेलिया 0-4 (ऑ स्ट्रे.)
भारत पराभूत वि. इंग्लंड 2-1 (भारतामध्ये)
भारताचा दोन कसोटी मालिका विजय
भारत वि.वि. वेस्ट इंडीज 2-0 (भारतात)
भारत वि.वि. न्यूझीलंड 2-0 (भारतात)