Home | Sports | From The Field | india west india, cricket, test match, suresh raina

भारतासमोर ४६२ धावांचे लक्ष्य ; सुरेश रैनाने ठोकले नाबाद शतक

वृत्तसंस्था | Update - Jul 18, 2011, 06:46 AM IST

कसोटीत नंबर वन असलेल्या भारतीया संघाला सॉमरसेट संघाने चांगलेच अडचणीत आणले. भारतासमोर या तीनदिवसीय सराव सामन्यात ४६२ धावांचे कठीण लक्ष्य ठेवण्यात आले.

  • india west india, cricket, test match, suresh raina

    टॉंटन: येथे सुरू असलेल्या सराव सामन्यात सॉमरसेट या दुय्यम दर्जाच्या संघाविरुद्ध टीम इंडिया बॅकफूटवर आली आहे. कसोटीत नंबर वन असलेल्या भारतीया संघाला सॉमरसेट संघाने चांगलेच अडचणीत आणले. भारतासमोर या तीनदिवसीय सराव सामन्यात ४६२ धावांचे कठीण लक्ष्य ठेवण्यात आले. अखेरचे वृत्त हाती आले त्या वेळी पावसाच्या व्यत्ययामुळे तिसºया दिवशीचा खेळ थांबला तोपर्यंत भारताने धावांचा पाठलाग करताना ६.३ षटकांत बिनबाद २४ धावा काढल्या होत्या. त्या वेळी अभिनव मुकुंद ११ आणि गौतम गंभीर १३ धावांवर खेळत होते.
    तत्पूर्वी भारताने आपल्या पहिल्या डावात केवळ २२४ धावा काढल्या. भारतीय संघाचा डाव ५२.२ षटकांतच आटोपला. भारताकडून मधल्या फळीचा फलंदाज रैनाने एकाकी नाबाद शतकी खेळी करून झुंज दिली.

Trending