आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SACHIN\'S LAST TEST: भारताची कसोटीवर मजबूत पकड, विंडीजचे 3 मोहरे गळाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वानखेडे स्टेडियमवर भारत-वेस्ट इंडिजदरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पकड घट्ट केली आहे. वेस्‍ट इंडिजचे तीन फलंदाज बाद झाले आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्‍हा वेस्‍ट इंडिजची 3 बाद 43 अशी स्थिती झाली होती. अश्विनने पॉवेल आणि ब्राव्‍होला बाद केले. तर नाईट वॉचमन म्‍हणून फलंदाजीस उतरलेल्‍या टीनो बेस्‍टला प्रग्‍यान ओझाने बाद केले. विं‍डीज अजुनही 270 धावांनी पिछाडीवर असून भारताला डावाने विजयाची संधी आहे. तसे झाल्‍यास अखेरची कसोटी खेळणा-या सचिन तेंडुलकरला पुन्‍हा फलंदाजीची संधी मिळणार नाही.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर अर्धशतक पूर्ण करून 74 धावांवर बाद झाला. 48 षटकातील 5 व्या चेंडुवर सचिनने ऑफ साईडवर शॉट मारला होता. स्पिनर नरसिंह देवनाराय याने टाकलेल्या बॉलवर सचिनला चौकार मारायचा होता. परंतु, या प्रयत्नात त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी याला सोपा झेल दिला. सचिनचे शतक हुकले तरीही त्‍याचा मुंबईचा सहकारी रोहित शर्माने शानदार शतक ठोकले. सचिनच्‍या अखेरच्‍या कसोटीत रोहितने शतक ठोकून सचिनला एक आगळीवेगळी भेट दिली. रोहितने सॅम्‍युअल्‍सला लॉंग ऑनवरुन उत्तुंग षटकार ठोकून शतक पूर्ण केले. रोहितने शतक ठोकल्‍यानंतर भारताचा डाव 495 धावांवर आटोपला. रोहित 111 धावांवर नाबाद राहिला. भारताने विंडीजवर 313 धावांची आघाडी घेतली आहे.
भारताच्या 86 षटकांमध्ये भारताच्या 6 बाद 400 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजाराने शानदार शतक झळकाविले. तो 113 धावांवर बाद झाला. विराट कोहली 57 धावा करून तर महेंद्रसिंह धोनी 4 धावा करून बाद झाला. त्‍यानंतर रोहित शर्माने डावाची सुत्रे हाती घेतली. रोहितने आर. अश्विन आणि मोहम्‍मद शमीसोबत दोन अर्धशतकी भागीदा-या केल्‍या त्‍याने भन्‍नाट फलंदाजी केली. अखेरच्‍या विकेटसाठी त्‍याने शमीसोबत अर्धशतकी भागीदारी केली. त्‍यात शमीचा वाटा केवळ 2 धावांचा होता.
सचिन तेंडुलकर खेळपट्टीवर असताना मैदानात जल्लोषाचे वातावरण होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी, राजकीय व्यक्ती सचिनचा खेळ बघण्यासाठी मैदानात हजर आहेत. सचिनची आई, पत्नी यासह कुटुंबातील इतरही सदस्य प्रेक्षक गॅलरीत आहेत. सचिनची फलंदाजी सुरू असताना मैदानातील आणि टीव्हीच्या माध्यमातून प्रत्यक्ष मैदानात असल्याचा आनंद लुटणारे प्रेक्षक प्रत्येक बॉल मनात नोंदवून घेत होते. सचिनचे अर्धशतक पूर्ण केले होते. परंतु, सचिन बाद झाल्यानंतर मैदानातील सर्वांचे चेहरे पडले आहेत. पुन्हा सचिनला कधी फलंदाजी मिळते याची ते वाट बघत आहेत.
अवघाचि माहोल सचिनमय!
राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे कडवे विरोधक राज ठाकरे, बॉलीवूड स्टार आमिर खान आणि वेस्ट इंडीजचे माजी कर्णधार क्लाइव्ह लॉइड किंवा केंद्रीय मंत्री तथा भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्यात काय साम्य असेल? ते म्हणजे ही मंडळी एकाच छताखाली अन् एकाच विषयावर चर्चा करत होते, सचिन तेंडुलकर...
सचिनची मैदानातील छायाचित्रे पुढील स्लाईडवर