आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Will Play Practice Match With Middlesex, Dhoni May Skip, News In Marathi

ए‍कदिवसीय मालिकेच्‍या सराव सामन्‍यात धोनी राहु शकतो अनुपस्थितीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन : इंग्‍लंडबरोबरच्‍या कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव स्विकारल्‍यानंतर भारतीय संघ व संघव्यवस्थापनत मोठे बदल झाले आहेत. पराभवाच्‍या मानसिकतेतून भारतीय संघ ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर शुक्रवारी मिडलसेक्सविरुद्ध वन-डे सराव सामन्यासाठी उतरणार आहे. खेळाडूंनी कसून सराव केला असून धोनी सराव सामन्‍याला अनुपस्थित होता. सराव सामन्‍यातध्‍ये धोनी खेळणार नसल्‍याचे सांगितल्‍या जात आहे.

भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान मालिकेतील पहिला वन-डे सामना 25 ऑगस्ट रोजी ब्रिस्टलमध्ये खेळल्या जाणार आहे. सराव सामन्‍यामध्‍ये संजु सॅमसनला खेळवले जावू शकते. सोबतच नवनियुक्त संचालक रवी शास्त्रीचीही कसोटी लागणार आहे. सराव सामन्यात विजय मिळविला तर भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल.